लुधियाना: भावाच्या अटकेवर चिडलेल्या तरूणाचे धक्कादायक कृत्य; पोलिसांकडून बदला घेण्यसाठी क्वारंटाईन सेंटरमधील पाण्याच्या टाकीत मिसळले विष
देशातील कोरोना बाधितांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना पंजाब (Panjab) येथील घटनने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले आहे. भावाच्या अटेकवर चिडलेल्या एका तरुणाने आपल्या सहकाऱ्यासह मिळून चक्क क्वारंटाईन सेंटमधील (Quarantine Center) पाण्याच्या टाकीत विष (Poison Mixed in a Water Tank) मिसवळे आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना पंजाब (Panjab) येथील घटनने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले आहे. भावाच्या अटेकवर चिडलेल्या एका तरुणाने आपल्या सहकाऱ्यासह मिळून चक्क क्वारंटाईन सेंटमधील (Quarantine Center) पाण्याच्या टाकीत विष (Poison Mixed in a Water Tank) मिसळले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी न झाल्याचे समजत आहे. ही घटना लुधियाना (Ludhiana) येथे घडली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीसह त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात हत्येचा कट रचल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
जतिंदर सिंह असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात लुटमारीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपी जतिंदरला अटक केली होती. यावेळी या टीममध्ये शिपाई गुरपिंदर सिंगही सहभागी होते. त्यानंतर गुरपिंदर यांची ड्युटी कृष्णा कॉलनीमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये लागली होती. जतिंदरचा भाऊ वरिंदरने शिपाई गुरपिंदर यांचा बदला घेण्याचे ठरवले. त्याने आपल्या मित्रांसह मिळून त्याची हत्या करण्याचे ठरवले. एवढेट नव्हे तर त्याने क्वारंटाईन सेंटरमधील दाखल असलेल्या रुग्णांनाही सोडणार नाही असे ठरवले. यामुळे त्याने आपल्या मित्राच्या मदतीने जोधेवालच्या कृ्ष्णा कॉलनी परिसरातील एका क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विषारी पदार्थ मिसळले. मात्र, जेव्हा शिपाई गुरपिंदर सिंग पाणी पिण्यासाठी तेथे आले तेव्हा टाकीतून वास येत होता. त्या वासामुळे त्यांची तब्येत बिघडू लागली. यावेळी सोबतच्या कर्मचाऱ्यांना सांगितले तेव्हा समजले की आरोपी छतावर होते. यातून क्वारंटाईन सेंटमधील पाण्याच्या टाकीत विष मिळसल्याचे उघड झाले आहे. हे देखील वाचा- अंधश्रद्धेचा कहर! हाताचे चुंबन घेऊन Coronavirus बरा करत होता कोरोना संक्रमित बाबा; संपर्कात आलेल्या 19 जणांना कोरोना विषाणूची लागण
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपींवर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींना बुधवारी न्यायालयात सादर करण्यात आले. येथून या तिघांनाही एक दिवसाच्या पोलिस रिमांडमध्ये पाठवण्यात आले. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.