Lok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश
दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या नेत्या जया प्रदा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या नेत्या जया प्रदा (Jaya Prada) यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. आझम खान यांच्याशी झालेल्या वादानंतर जयाप्रदा यांनी भाजपची वाट पकडली आहे.
रामपूर मतदारसंघातून जयाप्रदा यांना निवडणूकीसाठी तिकीट दिले जाईल, अशी चर्चा आहे. मात्र यासंदर्भात अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. यापूर्वी देखील 2004-2014 दरम्यान जयाप्रदा यांनी या मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडणूक लढवली होती.
ANI ट्विट:
1994 पासून जयाप्रदा यांनी 'तेलुगू देसम पार्टी'तून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. मात्र चंद्रबाबू नायडू यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांनी पार्टीला रामराम ठोकला. त्यानंतर जयाप्रदा यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश करत लोकसभेच्या निवडणूकीसाठी रामपूर मतदार संघातून निवडणूक जिंकली होती.
लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर सातत्याने पक्षांतर सुरु आहेच. पण त्याचबरोबर अनेक सेलिब्रेटी देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगत आहे.