Light Bonfire In Train: चालत्या एसी ट्रेनमध्ये पेटवली शेकोटी, घटनेचा व्हिडिओ आला समोर, तक्रार दाखल

या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

born fire PC Twitter

Light Bonfire In Train: चालत्या ट्रेनमध्ये  काही प्रवाशांनी शेकोटी लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एका युजर्सने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. चालत्या ट्रेनमध्ये काही पुरुषांच्या गटांनी शेकोटी लावली. ही घटना मेरठ- प्रयागराज संगम एक्स्प्रेसमध्ये घडल्याचे सांगत आहे.( हेही वाचा- कल्याण रेल्वे स्थानकामध्ये चालत्या ट्रेनमधून उतरताना पाय घसरलेल्या गरोदर बाईला RPF जवानाने दिलं जीवनदान)

मिळालेल्या माहितीनुसार, वातावरणात कडक्याची थंडी पडली असून थंडीचा बचाव करण्यासाठी प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये शेकोटी पेटवली.या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या पराक्रमाचा व्हिडिओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बनला आहे. धूर पाहिल्यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी या संदर्भात रेल्वे नियत्रंण कक्षाला माहिती दिली. या घटनेनंतर प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मेरठ-प्रयागराज संगम एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. प्राथमिक तपासात असे आढळून आले की आग भारतीय किसान युनियन (टिकैत गट) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कुशल पाल आर्य यांच्या समर्थकांनी लावली होती. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि प्रवाशांच्या तक्रारीनंतर यांच्याविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.



संबंधित बातम्या