Chennai News: प्रेक्षकांनी थिएटरमधील खुर्च्यांची केली तोडफोड, थलपती विजयच्या ‘Leo’च्या ट्रेलर स्क्रिनिंग दरम्यान नेमक काय घडलं

चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळी प्रेक्षकांनी थिएटरमधील खुर्च्या आणि काचेच्या भिंती तोडल्या. याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Chennai News: प्रेक्षकांनी थिएटरमधील खुर्च्यांची केली तोडफोड, थलपती विजयच्या ‘Leo’च्या ट्रेलर स्क्रिनिंग दरम्यान नेमक काय घडलं
Leo trailer screening

Chennai News: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता थलपती विजयचा लियो हा चित्रपट सद्या बहुचर्चित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये विजय आणि अभिनेता संजय दत्त हे दोघेही अॅक्शन अवतारात दिसले आहे. चैन्नई येथे खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. तर दरम्यान प्रेक्षकांनी थिएटर मध्ये नुकसान केललं चित्र पाहायला मिळालं आहे. चेन्नईतील रोहीणी चित्रपटात प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळी प्रेक्षकांनी थिएटरमधील खुर्च्या आणि काचेच्या भिंती तोडल्या.

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2023 04:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).