Vande Bharat Train Roof Leakage: 'वंदे भारत'च्या छतामधून गळती ; 100 कोटींच्या ट्रेनमधला Video व्हायरल, Railway चा रिप्लाय
देशात केलेल्या कामांपैकी सर्वात महत्त्वाचं काम म्हणून मोदी सरकारने अनेकदा वंदे भारतला अधोरेखित केलं आहे.
Vande Bharat Train Roof Leakage Video: एकीकडे बुलेट ट्रेनचं काम सुरु असतानाच मोदी सरकारने देशातील अनेक भागांमध्ये वंदे भारत ट्रेन्स (Vande Bharat Express)सुरु केल्या. या ट्रेन्समध्ये विमानासारख्या सेवा आणि सुविधा पुरवल्या जातात असं सांगण्यात आलं. अनेकांनी या ट्रेन्सचं कौतुक केलं. मात्र, आता वंदे भारतच्या छतामधून पाणी गळत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर सरकारने ट्रेन्सकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी सोमर आल्या आहेत.
प्रवाशाने पोस्ट केला धक्कादायक व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये या देशातील प्रिमिअम ट्रेनमध्ये चक्क पावसाचं पाणी गळताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून रेल्वेकडूनही या व्हिडीओला रिप्लाय देण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ऑटोमॅटिक दरवाजाजवळच्या पहिल्याच सीटजवळ लावलेल्या डिजीटल स्क्रीनसमोर छतामधून पाणी गळत असताना दिसत आहे. या ट्रेनमधील सीटवर कोणीही बसलेले नसलेले दिसत नाही. मात्र, अशी घटना स्विकार्ह नाही. भारतीय रेल्वेकडून आकारल्या जाणाऱ्या प्रिमिअम तिकीटदरांमध्ये या ट्रेनचा समावेश होतो. असं असतानाही ही अशी सेवा पुरवली जात असल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला आहे.
व्हिडीओ पहा-
रेल्वेकडून या पोस्टवर रिप्लाय करण्यात आला आहे. "संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आलेली आहे," असा रिप्लाय रेल्वे सेवा अकाऊंटवरुन देण्यात आला आहे. तसेच या व्यक्तीकडून प्रवासासंदर्भातील माहिती आणि त्याचा फोन नंबरही रेल्वे प्रशासनाने थेट मेसेजच्या माध्यमातून मागितला आहे.