Landslide In Uttarkashi: यमुनोत्री NH वर निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन, 40 हून अधिक कामगार अडकल्याची भीती

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन उत्तरकाशीने याला दुजोरा दिला आहे. बोगद्यात किती कामगार अडकले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. कंपनीकडून डेब्रिज हटवण्याचे काम सुरू आहे. पाच 108 रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.

Landslide प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Twitter)

Landslide In Uttarkashi: उत्तराखंडमधील (Uttarakhand) यमुनोत्री (Yamunotri) राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव या बोगद्यात भूस्खलन (Landslide) झाले आहे. एनएचआयडीसीएलच्या निर्देशानुसार नवयुग कंपनीमार्फत हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्यात 40 हून अधिक मजूर अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन उत्तरकाशीने याला दुजोरा दिला आहे. बोगद्यात किती कामगार अडकले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. कंपनीकडून डेब्रिज हटवण्याचे काम सुरू आहे. पाच 108 रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा -Tamilnadu News: निलगिरीत बिबट्याचा पत्रकारासह सहा जणांवर हल्ला, वनविभागाकडून शोध मोहिम सुरु)

एडीजी कायदा आणि सुव्यवस्था एपी अंशुमन यांनी सांगितले की, अद्याप मृत्यूची नोंद झालेली नाही. पोलिस दलासह एसडीआरएफ आणि इतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे 5 वाजता हा अपघात झाला. हे भूस्खलन बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सिल्क्यराकडे 200 मीटर अंतरावर झाले, तर काम करणारे कामगार वाहनाच्या प्रवेशद्वारापासून 2800 मीटर आत होते.

ऑलवेदर रोड प्रकल्पांतर्गत तयार होत असलेल्या बोगद्याची लांबी 4.5 किमी आहे. त्यापैकी चार किमीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यापूर्वी बोगदा बांधण्याचे उद्दिष्ट सप्टेंबर 2023 होते, मात्र आता ते मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement