Madhya Pradesh: इंदूरमध्ये लेडी गँगची दहशत, डॉमिनोज कंपनीत कामावर जाणाऱ्या तरुणीला अडवून केली बेदम मारहाण

माहितीनुसार ती मुलगी फूड कंपनी डॉमिनोजमध्ये काम करते. शनिवारी ती कामावर जाणार होती. त्यानंतर पिंकी आणि तिच्या तीन मैत्रिणींनी येऊन तिचा रस्ता अडवला. बोलण्यास सांगून जवळ बोलावून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

Photo Credit - Twitter

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) द्वारकापुरी शहरातील परिसरात लेडी गँगचा (Lady gang Terror) बळी ठरलेल्या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली. लेडी गँगच्या चार मुलींनी मिळून तरुणीला बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर पोलिसांनी (Police) चार मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी घडली असुन, ज्याचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनी यादव रहिवासी ऋषी पॅलेस कॉलनी यांच्या तक्रारीवरून पिंकी आणि त्याच कॉलनीत राहणाऱ्या तिच्या इतर तीन मैत्रिणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने सांगितले की ती फूड कंपनी डॉमिनोजमध्ये काम करते. शनिवारी कामावर जाणार होती. त्यानंतर पिंकी आणि तिच्या तीन मैत्रिणींनी येऊन तिचा रस्ता अडवला. बोलण्यास सांगून जवळ बोलावून लाथा-बुक्क्यांनी तीला मारहाण केली. (हे देखील वाचा: Crime: विद्यार्थिनींची छेड काढल्याप्रकरणी सरकारी शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल)

Tweet

मुलगी तिथे रस्त्यावर पडली. बराच वेळ ती मदत मागत राहिली, पण तिला मदत करायला कोणीच आले नाही. नंतर दुसऱ्याच्या घरी जाऊन तिने आपला जीव वाचवला. इतकंच नाही तर लेडी गँगनेच मारहाणीचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पिंकी ही टोळी परिसरात चोरट्यांसोबत फिरत असल्याचे सांगण्यात आले. तिचे वडीलही अवैध दारू आणि अवैध धंद्यात गुंतलेले आहेत. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement