kangana Ranaut Slapping Case: कंगना रणौतला थप्पड मारल्या प्रकरणी खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून कॉन्स्टेबलला बक्षीस जाहीर
हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत यांना थप्पड मारल्याप्रकरणी महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर चर्चेत आल्या आहेत.
kangana Ranaut Slapping Case: हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत यांना थप्पड मारल्याप्रकरणी महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर चर्चेत आल्या आहेत. खलिस्तानी दहशतवादी पन्नूने दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने CISF कॉन्स्टेबलचे कौतुक करणारा व्हिडिओ समोर आला आहे. कंगणाला थप्पड मारल्याने ते खूश असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (हेही वाचा- नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने मारली थप्पड; चंदीगड विमानतळावर घडली घटना, अभिनेत्रीचा आरोप )
मिळालेल्या माहितीनुसार, गुरपतवंत सिंग पन्नू यांनी महिला कॉन्स्टेबलला 10,000 डॉलर 8 लाख भारतीय रुपये बक्षीस जाहिर करतो.धक्कादायक म्हणजे पन्नू यांनी एकदा पीएम मोदींसाठी अपशब्द वापरले आहेत. चित्रपट अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगणा रणौत दिल्लीला रवाना होत असताना चंदिगड वितानतळावर त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले. दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल महिला कॉन्स्टेबल कुरविंदर कौर यांनी कंगनाला थप्पड मारली.
या घटनेमुळे देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर कंगणाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये असं लिहले होते की, महिला कॉन्स्टेबलने खलिस्तानी स्टाईलमध्ये तिच्या चेहऱ्यावर थप्पड मारली. कदाचित खलिस्तानमध्ये सामील होण्याचा त्यांचा हा मार्ग असावा असेही त्यांनी म्हटले आहे.
या घटनेनंतर कंगणाच्या तक्रारीवरून महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. मात्र, या घटनेत खलिस्तानी दहशतवाद्याचे समर्थन आणि बक्षीस जाहीर करणे ही गंभीर बाब आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर देखील कंगणाच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला तर काहींनी कॉन्स्टेबलचे कौतुक केले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.