Kerala Shocker: पैशांच्या लालसेपोटी पत्नीला किडनी विकण्यास पाडले भाग, पती आणि मध्यस्थाविरोधात पोलिसांत तक्रार
पिडीत पत्नीने पती आणि आणखी एका विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पिडीत महिलेला किडनी विकण्याच्या बदल्यात नऊ लाख दिले होते.
Kerala Shocker: केरळमधील केलकम येथे आदिवासी महिलेला(Tribal Woman) किडनी (Kidney)विकण्यासाठी भाग पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याबाबत पिडीत महिलेने पती आणि एका मध्यस्थाविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. तिचा पती आणि एक मध्यस्थ तिला तिची किडनी विकण्यास भाग पाडले होते. पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिला किडनी विकण्यासाठी नऊ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. महिलेने सांगितले की, तिचा पती आणि बेन्नी नावाच्या मध्यस्थ दोघांनीही यापूर्वी त्यांची किडनी दान केली होती. त्याबदल्यात त्यांना पैसेही मिळाले होते. मात्र, आता ते मध्यस्थ म्हणून काम करत आहेत. (हेही वाचा:West Bengal: भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई; 12 कोटींची 89 सोन्याची बिस्किटे जप्त)
तिने सांगितले की, काही दिवसांपूर्वी बेन्नी यांनी महिलेला पती आजारी असल्याचे खोटे सांगून तिला कोची येथे बोलावून घेतले होते. त्यांच्या पतीची प्रकृती गंभीर असल्याचे खोटे तिला सांगितले होते. त्यावर महिला तेएथ दाखल झाली तेव्हा. तिला किडनी विकण्यासाठी भाग पाडले. बेन्नीने कन्नूरमधील अनेक आदिवासी लोकांना किडनी विकण्यासाठी आमिष दाखवले होते. यात त्याला प्रचंड पैसे मिळत होते.
नुकतचं केरळमध्ये किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला.19 मे रोजी कोची येथे सबित नसर याला अटक करण्यात आली होती. केरळच्या विविध भागातून किडनी विक्रीच्या तक्रारी समोर येत आहेत. "पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवली असून तक्रारीच्या आधारे सविस्तर चौकशी सुरू आहे."असे, पेरावूर डीएसपी अश्रफ थेंगलक्कंदिल यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले.