Karnataka Video: मटण दुकानात मालकाचा पत्रकारावर हल्ला, कर्नाटकातील घटना, व्हिडिओ व्हायरल
कर्नाटकातील कोलार येथे मटण दुकानाच्या मालकाने पत्रकारावर चाकून हल्ला केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे
Karnataka Video: कर्नाटकातील कोलार येथे मटण दुकानाच्या मालकाने पत्रकारावर चाकून हल्ला केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रकाराने मटण दुकानाच्या मालकावर त्याच्या दुकानात चोरीची चिकन विकल्याचा आरोप केला आहे. ही घटना कॅमेरात कैद झाली, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियवरल व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, मटण दुकाणदाराचा मालकाने दिवसाढवळ्या पत्रकारावर चाकूने हल्ला केला. (हेही वाचा- बोरिवलीतील गेस्ट हाऊसमधून 3 बंदुका, 36 जिवंत काडतुसं जप्त, दिल्लीच्या सहाजणांना अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात पत्रकाराला कोणतीही दुखापत झाली नाही आणि स्थानिक लोकांनी वेळेवर मदत केली आणि पत्रकाराला वाचवले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस उपस्थित झाले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की पत्रकार दुकान मालकाच्या मागे जात आहे आणि त्याला काही प्रश्न विचारत दुकानात पोहोचतो.
व्हिडिओमधील पत्रकार पुढे दावा करतो की मोहम्मद ताज फिर असे दुकानादाराचे नाव आहे. दुकान मालक स्वस्त दरात चिकन विकत होते. चोरीची चिकन विकत असल्याने त्यांच्या दुकानात चिकन स्वस्त असल्याचा दावाही त्यांनी केला. या दाव्यामुळे दुकानमालक संतापला, त्याने चाकू घेतला आणि पत्रकारावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी होण्यापासून पत्रकाराला वाचवण्यात आले. दरम्यान एक पोलिस हा गोंधळ पाहून लगेच आणि पत्रकराचे प्राण वाचवतो. दुकान मालकावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.