Kanpur Road Accident: कानपूर महामार्गावर भीषण अपघातात 4 ठार, 2 जखमी

कानपूर महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. इटावा येथील इकदिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. त्याचवेळी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.

Photo Credit- X

Kanpur Road Accident: कानपूर महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. इटावा येथील इकदिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. त्याचवेळी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. एकदिल, इटावा येथे झालेल्या या अपघातामागे कार चालक झोपी गेल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. बुधवारी सकाळी 6.30 वाजता घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. हे देखील वाचा: US Plane Crash: अमेरिकेत विमान क्रॅश, घटनेत 2 ठार, 1 महिला जखमी

अग्निशमन विभागालाही घटनेची माहिती देण्यात आली. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन विभागाचे जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढले. चार मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही.

दिल्लीतील एक कुटुंब कारमधून हमीरपूरला निघाले होते, असे सांगण्यात येत आहे. येथे कारने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. इटावा जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, चारचाकी आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात एक बालक व एक महिला गंभीर जखमी झाले आहेत . 4 मृतदेहही रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement