Kanpur Crime News: जमिनीच्या वादातून दोघा भावांमध्ये भांडण, कुऱ्हाडीने वार करून पुतण्याला संपवले, कानपूर येथील घटना
कानपूरमध्ये जमिनीच्या वादावरून भावावर आणि पुतण्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Kanpur Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये जमिनीच्या वादावरून भावावर आणि पुतण्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसरा पुतणा आणि भाऊ गंभीर जखमी झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेमुळे कानपूर शहर हादरले आहे.
पोलिसांनी या घटनेअंतर्गत एका आरोपीला अटक केले आहे तर उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली आहे. ही घटना गौरी गावात घडली. देवरहाट पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली. शेतात काम करत असताना ही घटना घडली. दोन्ही भावांमध्ये भांडण सुरु झाला. मात्र काही वेळातच त्यांच्या हाणामारी झाली. यानंतर काकांनी आपल्या भावावर आणि पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात पुतण्या गंभीर झाला, जमिनीवर पडला. दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जीवघेण्या हल्लेत दोघ जण जखमी झाले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांना या घटनेची माहिती देताच घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला पोलिसांना पकडले परंतु आरोपी सोबत आणखी गुन्हेगार सोबत असल्याची माहिती मिळाली आहे.पोलिस त्यांच्या शोधात आहे. घटनेती अन्य आरोपींना लवकर अटक करू अशी माहिती पोलीसांनी दिली.
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2023 09:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

