Jammu and Kashmir Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू(Watch Video)

यात सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला कंठस्नान घालते आहे. सध्या तेथे सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.

Photo Credit -X

Jammu and Kashmir Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळावरी रात्री चकमक झाली. यात सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला कंठस्नान घालते आहे. जम्मू-काश्मीर(Jammu and Kashmir)मधील कठुआ येथील हिरानगर येथे ही चकमक झाली. यात सुरक्षा दलाला एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. तेथे सध्या  सर्च ऑपरेशन (Search Operation) सुरू आहे. कठुआ येथील हिरानगरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती सैदा सुखल ग्रामस्थांनी सुरक्षा दलाला दिली. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्म झाला आहे. (हेही वाचा:Reasi Terror Attack: दहशतवाद्यांकडून जम्मू कश्मीर मध्ये भाविकांच्या बस वर झालेल्या गोळीबाराचे CCTV Footage आले समोर)

पोस्ट पाहा-

जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी भाविकांनी भरलेल्या बसवर दहशदवाद्यांनी हल्ला केला होता. या घटनेत नऊ भाविकांचा मृत्यू झाला तर 41 जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर बस दरीत कोसळली होती. बसचा अपघाता झाल्यानंरही दहशतवाद्यांनी जवळपास तासभर बसवर गोळीबार सुरूच ठेवला होता. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 10 जणांना गोळ्या लागल्या होत्या. त्यातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे.