Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर एका व्यक्तीने केली घुसखोरी, जवानांनी केले ठार

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. अधिका-याने सांगितले की जो कोणी “ वाईट हेतूने” भारतीय भूमीवर पाऊल ठेवेल त्याला हेच नशिबी येईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 45 वर्षीय निशस्त्र घुसखोर बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तानच्या तुघलियालपूर चौकीतून घुसला होता आणि मंगूचक भागातील खोरा चौकीजवळ त्याला ठार करण्यात आले.

Jammu and Kashmir

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. अधिका-याने सांगितले की जो कोणी “ वाईट हेतूने” भारतीय भूमीवर पाऊल ठेवेल त्याला हेच नशिबी येईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 45 वर्षीय निशस्त्र घुसखोर बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तानच्या तुघलियालपूर चौकीतून घुसला होता आणि मंगूचक भागातील खोरा चौकीजवळ त्याला ठार करण्यात आले.  बीएसएफचे जम्मू फ्रंटियर इंस्पेक्टर जनरल डीके बुरा यांनी घटनास्थळाजवळ पत्रकारांना सांगितले की, "रात्री 10.15 वाजता, फॉरवर्ड ड्युटी पॉईंट (सीमा सुरक्षा दलाच्या) वरून पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत असलेल्या व्यक्तीची हालचाल लक्षात आली. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आणि जेव्हा त्याने प्रवेश केला तेव्हा त्याला आव्हान देण्यात आले." मुसळधार पाऊस असूनही, बुरा यांच्यासह इतर वरिष्ठ बीएसएफ अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी सकाळी घुसखोरी करण्यात आलेल्या भागाला भेट दिली आणि सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. हे देखील वाचा: Who is Swapnil Kusale: कोण आहे स्वप्नील कुसळे? ज्याने साधला निशाणा, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पटकवले कास्य पदक!

बुरा म्हणाले, “घुसखोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण सतर्क जवानांनी गोळीबार केला आणि त्याला ठार केले. परिसराचा शोध अजूनही सुरू आहे. ते म्हणाले की, घुसखोराला जाणीवपूर्वक पाठवले गेले होते आणि सुरक्षेतील काही त्रुटी शोधून काढण्यात आल्याचे दिसते ज्याचा फायदा घेऊन नंतर सशस्त्र दहशतवादी पाठवले जाऊ शकतात. बुरा म्हणाले, "हे ऑपरेशन केवळ एक यश नाही तर एक धडा आहे की, जो कोणी वाईट हेतूने भारतीय भूमीवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करेल त्याला घुसखोरांसारखेच भोगावे लागेल."

अधिका-यांनी सांगितले की, घुसखोराचा मृतदेह सीमेवरील कुंपणाजवळून सापडला आहे, परंतु त्याच्याकडून कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यांनी सांगितले की, मृतांची ओळख तात्काळ पटू शकली नाही. शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर प्रक्रियांसाठी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.