Punjab Crime News: संपत्ती हडपण्यासाठी मुलानेच केली घरातल्या तिघांची गोळी झाडून हत्या, जालंधर येथे खळबळ, आरोपीला अटक

कुटुंबातील मुलाने आई, वडिल आणि भावाची हत्या केली. या धटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Punjab Crime News:  संपत्ती हडपण्यासाठी मुलानेच केली घरातल्या तिघांची गोळी झाडून हत्या, जालंधर येथे खळबळ, आरोपीला अटक
Murder | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Punjab Crime News: पंजाबमधील जालंधर येथील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे, या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली आहे. खून झालेल्या तिघांमध्ये आरोपीचे वडिल, आई, आणि भावाचा समावेश आहे. जालंधर येथील लांबरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टॉवर एन्क्लेव्ह फेज ३ मध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच जालधंर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आणि तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव हरप्रीत आहे. त्याने वडिलांच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने तिघांची हत्या केली. मालमत्तेच्या वादातून आरोपीने हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आरोपीने आईच्या मानेवर गोळी झाडली, तर भावाच्या डोक्यात गोळी झाडली. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र शांतता पसरली आहे.

घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून फरार झाला आहे. मात्र, ज्या बंदुकीने गोळी झाडली ते  शस्त्र त्याने तेथेच सोडले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्र जप्त केले आहे. पोलिसांची अनेक पथके आरोपींच्या शोध सुरु केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतांच्या नातेवाईकांकडून घटनेची माहिती गोळा करण्यात आली आहे. पोलीस लवकरच आरोपींना अटक करतील. आरोपीने हा गुन्हा का केला याचा शोध सुरु केला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2023 11:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).