Jaipur Fire: जयपूरमध्ये पेट्रोल पंपावरील आगीच्या घटनेत 5 ठार, 37 जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता (Watch Video)
तर, पाच जणांचा मृत्यू झाला असून 37 जण जखमी झाले आहेत.
Jaipur Fire: जयपूर-अजमेर राष्ट्रीय (Jaipur Ajmer Highway)महामार्गावर शुक्रवारी सकाळी रसायनांनी भरलेला टँकर(LPG Tanker) ट्रॅकटवर आदळल्याने झालेल्या भीषण आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. तर 37 जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. आगीत सुमारे 30 ट्रक आणि इतर वाहने जळून खाक झाल्याचे त्यांनी सांगितले. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी एसएमएस हॉस्पिटलमध्ये जखमींना भेट दिली. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले. शर्मा यांनीही अपघातस्थळी भेट दिली. (Jaipur Petrol Pump Fire: जयपूरमध्ये पॅट्रोल पंपावर सीएनजी टँकर आणि ट्रक्टरची जोरदार धडक; आगीत 10-12 सीएनजी वाहने जळून खाक, अनेक जण जखमी झाल्याचा अंदाज)
जयपूर फायर व्हिडिओ
प्रशासनाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू
प्रशासनाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू ठेवण्यात आले आहे. भांक्रोटाचे एसएचओ मनीष गुप्ता यांनी सांगितले की, "आग आटोक्यात आणणे खूप कठीण होते. अग्निशमन दलाचे पथक जळत्या गाड्यांपर्यंत पोहोचू शकले नाही. बाधित भागात तीन पेट्रोल पंप होते पण सुदैवाने ते सुरक्षित आहेत." 25 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. या अपघातामुळे महामार्गाचा जवळपास 300 मीटरचा भाग बाधित झाला. वाहतूक ठप्प झाल्याने काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.