Jadavpur University Student's Death Case: जाधवपूर विद्यापीठात रॅगिंगला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या; मुख्य आरोपीसह 2 विद्यार्थ्यांना अटक

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Arrested | (File Image)

Jadavpur University Student's Death Case:  जाधवपूर विद्यापीठाच्या (Jadhavpur University) कॅम्पसच्या एका बिल्डींगच्या बाल्कनीतून पडून 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग (Ragging) सुरू असताना हे दोघे घटनास्थळी हजर होते. यापूर्वी पोलिसांनी या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी सौरभ चौधरीला अटक केली होती. शनिवारी त्याला 22 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. चौधरी हा माजी विद्यार्थी वसतिगृहात बेकायदेशीरपणे राहत होता. त्याने 2022 मध्ये गणितात एमएससी केले.

या दोघांनी मृत स्वप्नोदीप कुंडू नावाचा तरुणाचा मानसिक छळ केला, मुख्य आरोपी सौरव चौधरी, जादवपूर विद्यापीठाचा माजी विद्यार्थी, त्याला आधीच अटक करण्यात आली आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. दीपशेखर दत्ता (19) आणि मनोतोष घोष (20) अशी आता अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांचा या घटने संदर्भात आणखी तपास चालू आहे. पोलीसांनी तीघांवर रॅंगिंग संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

विविध अहवालांनुसार, प्राथमिक तपासात असे सुचवले आहे की पीडितेला भरपूर रॅगिंग केले गेले होते, पोलिस सूत्रांनी सांगितले की ते लैंगिक छळाच्या तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मयत मुलाला अनेक वेळा मानसिक छळाला सामेरे जावे लागले. त्याचसोबत त्याला स्ट्रिपींग सारख्या गोष्टीला देखील सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे तरुणांने टोकांचे पाऊल उचलून स्वत:चा आयुष्य संपवून टाकले. स्वप्नोदीपने बुधवारी त्याच्या आईला फोन करून बर नसल्याचे सांगितले सोबत तो खूप घाबरला आहे हे देखील सांगितले. त्याच दिवसी एक तासानंतर स्वप्नोदीपच्या आईला विद्यापीठाच्या बाल्कनीतून पडल्याची घटना सांगण्यात आली.