रेल्वे स्टेशनवरील खाद्यपदार्थांचे दर महागले; 28 मार्च नंतर जेवणही महागणार

त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. हे दर तात्काळ लागू होणारा आहेत. परंतु, जन आहार केंद्र, रिफ्रेशमेंट रूम स्टेशनच्या स्टॉल्सवर मिळणारे जेवण रेल्वेच्या पँट्री कारमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या तुलनेने 10 रुपयांनी स्वस्त असणार आहे.

IRCTC FOOD MENU RATES Increased(PC -Twitter)

भारतीय रेल्वेने आपल्या सर्व जन आहार केंद्र तसेच रिफ्रेशमेंच रूम स्टेशनचे सर्व स्टॉल्सवरील खाण्या-पिण्याचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. हे दर तात्काळ लागू होणारा आहेत. परंतु, जन आहार केंद्र, रिफ्रेशमेंट रूम स्टेशनच्या स्टॉल्सवर मिळणारे जेवण रेल्वेच्या पँट्री कारमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या तुलनेने 10 रुपयांनी स्वस्त असणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेने ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाचेदेखील दर वाढवण्याची घोषणा केली होती.

भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये मिळणारा चहा, नाश्ता आणि जेवणाचे दर वाढवण्याचा निर्णय याअगोदर घेतला होता. तसेच रेल्वे बोर्डाने राजधानी, शताब्दी आणि दुरंतो या रेल्वे गाड्यांमध्ये चहा, नाश्ता आणि जेवणाचे दर वाढवण्याचे परिपत्रक जारी केले आहे. रेल्वेने वाढवलेले नवीन दर मेल, एक्‍सप्रेस आणि दुसऱ्या रेल्वेगाड्यांत लागू होणार आहेत. रेल्वेने वाढवलेले हे नवीन दर 28 मार्च 2020 पासून लागू करण्यात येणार आहे. (हेही वाचा - ठाणेकरांसाठी खुशखबर! ठाणे आणि मुलुंडदरम्यान नव्या रेल्वे स्टेशनला मंजुरी; सरकार 14 एकर जागा देणार)

खाद्यपदार्थांचे प्रकार आणि दर रुपयांतमध्ये (जीएसटीसह) 

रेल्वेने खाद्यपदार्थांच्या दरात वाढ केली असली तरी प्रवाशांना जन आहार केंद्र, रिफ्रेशमेंट रूम स्टेशनच्या स्टॉल्सवर मिळणारे जेवण परवडणार आहे. कारण हे पदार्थ रेल्वेच्या पँट्री कारमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या तुलनेने 10 रुपयांनी स्वस्त असणार आहे.