Interfaith Couple Attacked in Hyderabad: हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला; चौघांना अटक

तसेच आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथके तयार केली. दुसऱ्या दिवशी चार जणांना अटक करण्यात आली. आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यात व्हायरल व्हिडिओ आहेत.

Arrested | (File Image)

Interfaith Couple Attacked in Hyderabad: हैदराबाद (Hyderabad) मध्ये एका आंतरधर्मीय जोडप्याचा छळ केल्याप्रकरणी चारमिनार पोलिसांनी (Charminar Police) सोमवारी चार जणांना अटक (Arrest) केली. आरोपींनी दाम्पत्यावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर चारमिनार पोलिसांनी तपास सुरू करून आरोपीला अटक केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बुरखा घातलेला एक व्यक्ती महिला आणि एका मुलासोबत कुठेतरी जाताना दिसत आहे. यावेळी आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. वास्तविक, चारमिनारमध्ये त्याला एका मुस्लिम महिलेसोबत पाहिल्यानंतर आरोपी संतापले आणि त्यांनी भांडण सुरू केले.

पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणी दखल घेतली आणि मंगळवारी गुन्हा नोंदवला. तसेच आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथके तयार केली. दुसऱ्या दिवशी चार जणांना अटक करण्यात आली. आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यात व्हायरल व्हिडिओ आहेत. (हेही वाचा - Couple Assaulted in Haveri: कर्नाटकात हॉटेलरूम मध्ये घुसून जोडप्याला मारहाण; 2 जण अटकेत)

चारमिनारचे एसीपी पी. चंद्रशेखर यांनी सांगितलं की, चार जणांनी जोडप्यासोबत गैरवर्तन केले. महिलेसोबत एक मूलही होते. आरोपींनी मुलालाही इजा करण्याचा प्रयत्न केला. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.