World's Strongest Passports in 2022: स्ट्रॉंग पासपोर्ट यादीत भारत कितव्या स्थानावर? कोणत्या देश अव्वल? घ्या जाणून

आर्टन कॅपिटल (Arton Capital) ही यादी प्रकाशित करते. महत्त्वाचे म्हणजे आर्टन कॅपिटलने प्रकाशित केलेला पासपोर्ट इंडेक्स 2022 (Passport Index 2022) हा पासपोर्टचा जगातील सर्वात स्ट्रॉंग आणि कमकुवत क्रम (Indian Passport) आहे. हा क्रम तुम्हाला पासपोर्ट रँकिंगमध्ये व्हिसा न घेता तुम्ही किती देशांमध्ये प्रवेश करू शकता याबाबत माहिती देतो.

Indian Passport | Representational Image

जगातील सर्वात स्ट्रॉंग पासपोर्ट (World's strongest passports in 2022) असलेल्या देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आर्टन कॅपिटल (Arton Capital) ही यादी प्रकाशित करते. महत्त्वाचे म्हणजे आर्टन कॅपिटलने प्रकाशित केलेला पासपोर्ट इंडेक्स 2022 (Passport Index 2022) हा पासपोर्टचा जगातील सर्वात स्ट्रॉंग आणि कमकुवत क्रम (Indian Passport) आहे. हा क्रम तुम्हाला पासपोर्ट रँकिंगमध्ये व्हिसा न घेता तुम्ही किती देशांमध्ये प्रवेश करू शकता याबाबत माहिती देतो. या क्रमवारीत भारताचा कितवा क्रमांक आहे असा सवाल सहाजिकच तुमच्या मनात निर्माण झाला असेल. जगातील सर्वात स्ट्रॉंग पासपोर्ट यादीत भारत 87 व्या क्रमांकावर आहे, तर UAE 2022 च्या पासपोर्टच्या रेटिंगमध्ये प्रथम स्थानावर आहे हे अलीकडेच सार्वजनिक करण्यात आले आहे.

पासपोर्ट म्हणजे काय?

पासपोर्ट म्हणजे संबंधित नागरिक राहात असलेल्या देशाच्या सरकारने नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाटी उपलब्ध करुन दिलेला दस्तऐवज होय. जो आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या उद्देशाने नागरिकाची ओळख आणि राष्ट्रीयत्व सत्यापित करतो. आर्टन कॅपिटलने जारी केलेल्या यादीनुसार, यूएई पासपोर्टसह प्रवासी 180 देशांमध्ये त्रासमुक्त प्रवेश करू शकतात. (हेही वाचा, Passport Application: नवीन पासपोर्ट काढण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक? येथे पहा संपूर्ण यादी)

पासपोर्ट इंडेक्स पद्धत

पासपोर्ट इंडेक्स पद्धत युनायटेड नेशन्सच्या 139 सदस्यांवर आधारित आहे. महत्त्वाचे म्हणजे या यादीसाठी जगभरातील व्यापक अशा सहा प्रदेशांचा विचार करण्यात आला आहे. हा डेटा सरकारद्वारे प्रदान केलेल्या अधिकृत माहितीवर आधारित आहे. हा डेटा क्राउडसोर्सिंगद्वारे मिळवलेल्या बुद्धिमत्तेसह रिअल-टाइममध्ये अद्ययावत केला जातो. अत्यंत विश्वासार्ह स्त्रोतांकडून मालकी संशोधनासह हा डेटा संग्रहित केला जातो.

आर्टन कॅपिटलने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पासपोर्टची वैयक्तिक रँक निश्चित करण्यासाठी, तीन-स्तरीय पद्धत लागू केली जाते. जी मोबिलिटी स्कोअर (MS) आहे. ही पद्धत खालील प्रमाणे

  • व्हिसा-फ्री (VF)
  • व्हिसा ऑन अरायव्हल (VOA)
  • eTA आणि eVisa (3 दिवसात जारी केल्यास)

दरम्यान, VOA आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2018 (UNDP HDI) च्या स्कोअरचा VF भाग टाय ब्रेकर म्हणून वापरला जातो. यूएनडीपी एचडीआय हे देशाच्या परदेशातील आकलनाचे महत्त्वपूर्ण पर्याय म्हणून ओळखला जातो.

पासपोर्ट इंडेक्स यादीत सुरुवातीला UAE नंतर पहिल्या दहा स्थानांवर युरोपीय देशांचा दबदबा होता. मात्र, UAE नंतर आता जर्मनी, स्वीडन, फिनलंड, लक्झेंबर्ग, स्पेन फ्रान्स यांचा क्रमांक लागतो. अफगाणिस्तान शेवटच्या स्थानावर तर पाकिस्तान 94 वर आहे. तर भारताचा या यादीत 87 वा क्रमांक लागतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now