Cryptocurrency Exchange: क्रिप्टोकरन्सी बदलण्यात भारतीय महिला आघाडीवर, छोट्या शहरांमध्ये संख्या अधिक- रिपोर्ट

क्रिप्टोकरन्सी एक्चेंज (Cryptocurrency Exchange) वजीरएक्स (WazirX) ने नुकतीच एक आकडेवारी जारी केली. या आकडेवारीनुसार देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या शहरांमध्ये क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. भारतात याचे प्रमाण 2,648% इतके असल्याचे पाहायला मिळते आहे.

Cryptocurrency | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

क्रिप्टोकरन्सी एक्चेंज (Cryptocurrency Exchange) वजीरएक्स (WazirX) ने नुकतीच एक आकडेवारी जारी केली. या आकडेवारीनुसार देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या शहरांमध्ये क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. भारतात याचे प्रमाण 2,648% इतके असल्याचे पाहायला मिळते आहे. ज्यात मोठ्या शहरांच्या तुलनेत छोट्या शहरांतील महिलांचा अधिक समावेश आणि गुंतवणूक आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या शहरांनी सन 2021 या विद्यमान वर्षात आपल्या एकूण वापरकर्त्यांच्या साइन अप (Sign Up For Digital Coins) करण्याबाबत सुमारे 55% हिस्सा व्यापला आहे. जो प्रथम क्रमांकांच्या शहरांना पाठीमागे टाकून 2,375 % वाढ दर्शवतो आहे.

क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये या वेळी 79 लाख पेक्षाही अधिक उपयोगकर्ते आहेत. आतापर्यंत सन 2021 मध्ये ट्रेडिंग वॉल्यूममध्ये 21.8 अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहेत. वजीरएक्सचे सीईओ निश्चल शेट्टी यांनी म्हटले आहे की, क्रिप्टोमध्ये ग्रामीण भारत आर्थिक डचणू दूर करुन आणि गुंतुवणुकीत स्वस्त सेवा पोहोचवल्यास ऑनलाईन नोकऱ्या देण्याची मोठी शक्यता आहे. (हेही वाचा, Ray Dalio On Bitcoin: जगप्रसिद्ध फंड मॅनेजर रे डालियो यांच्याकडून Cryptocurrency चे समर्थन म्हणाले, 'माझ्याकडेही आहेत बिटकॉईन')

अहमदाबाद, लखनऊ आणि पटना यांसारख्या शहरांनी सरासरी 2,950% वाढ दर्शवली आहे. तर रांची, इम्फाल आणि मोहाली ने वजीरएक्स 2,455%ची सरासरी वृद्धी दर्शवली आहे. याशिवाय या क्षेत्रात संपूर्ण देशात महिलांद्वारे एकूण साईन अप 65% योगदान मिळाल्याचेही पुढे आले आहे.

कंपनीने म्हटले आहे की, क्रिप्टो समूहाला धन्यावात देत आणि स्थानिक गुंतवणूक तसेच प्रतभांचे समर्थन करण्यासाठी 11 ऑगस्टपासून एक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सांगण्यात आले आहे की, 1.5 कोटी पेक्षाही अधिक भारतीयांजवळ 1,500 रुपयांपेक्षाही अधिक क्रिप्टो एसेट्स आहे. उद्योग विशेषज्ञांनुसार क्रिप्टो करन्सी 21 व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण संपत्तीची कक्षा ठरु शकते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement