UPSC ISS Exam Notification 2020: यूपीएससी आईएसएस परीक्षा नोटिफिकेशन जारी; upsc.gov.in वर पहा पात्रता निकष ते अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख बाबत अधिक माहिती
Indian Statistical Services (ISS) Exam 2020 साठी काल (10 जून) संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Commission) ने एक अधिकृत नोटिफिकेशन जारी केले आहे.
Indian Statistical Services (ISS) Exam 2020 साठी काल (10 जून) संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Commission) ने एक अधिकृत नोटिफिकेशन जारी केले आहे. दरम्यान यासोबतच आता त्यासाठी अॅप्लिकेशन करण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. दरम्यान 30 जून दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत upsconline.nic.in या संकेतस्थळावर इच्छुक उमेदवार आपला अर्ज दाखल करू शकतात. सुमारे 47 पदांसाठी ही भरती होणार असून त्यासाठी 16 ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे. UPSC अर्ज दाखल केलेल्या आणि एक अटेम्प्ट राखून ठेवू इच्छिणार्यांना 7 ते 13 जुलै दरम्यान त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी मुभा देणार आहे.
युपीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज दाखल करताना 200 रूपये प्रवेश शुल्क आकरले जाणार आहे. महिलांसह जातीनुसार आरक्षित उमेदवार, दिव्यांगांना हे शुल्क माफ असेल.
Indian Statistical Services परीक्षा देणार्यांसाठी महत्त्वाची माहिती
अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
एकूण जागांसाठी भरती: 47
वयोमर्यादा: 21 ते 30 वर्ष
शैक्षणिक पात्रता: statistics/mathematical statistics/ applied statistics या विषयामध्ये मास्टर किंवा ग्रॅज्युएट डिग्री
दरम्यान आतापर्यंत IES आणि ISS परीक्षांसाठी एकत्रच नोटिफिकेशन काढली जात असे. मात्र यंदा IES साठी जागा रिक्त नसल्याचं सांगत केवळ ISS परीक्षांसाठी नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे.