Aadhaar Card: देशातील कोट्यावधी आधार कार्डधारकांना सरकारने दिला इशारा? काय आहे नेमकी प्रकरण जाणून घ्या

UIDAI ने स्वतः आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर केलेल्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, हा फेक अलर्ट आहे.

Aadhaar Card प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

Aadhaar Card: सध्या आधार कार्ड (Aadhaar Card) हे आपले सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. मात्र, आधार कार्डची गरज आणि महत्त्व लक्षात घेता त्याची सुरक्षाही वाढवली पाहिजे. वास्तविक, आधार कार्डमध्ये तुमचे नाव, पत्ताच नाही तर बुबुळ आणि बोटांचे ठसे देखील नोंदवले जातात. त्यामुळे तुमच्या आधार कार्डसोबत अनेक प्रकारची फसवणूक होऊ शकते. दरम्यान, सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये आधार myaadhaar.uidai.gov.in ची लिंकही देण्यात आली आहे.

अनेक कामांसाठी आपल्याला आधार कार्डची छायाप्रत द्यावी लागते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये सरकारने आधार कार्डबाबत महत्त्वपूर्ण आदेश जारी केल्याचा दावा केला जात आहे. नवीन सूचनांनुसार, सरकारने लोकांना त्यांच्या आधार कार्डच्या छायाप्रती कोणालाही, कुठेही, कोणत्याही कारणासाठी देऊ नयेत असे सांगितले आहे. आधार कार्डचा गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने हा आदेश जारी केल्याचे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा - Aadhaar-Pan Link: 31 मार्चपर्यंत आधार-पॅन कार्ड करा लिंक; अन्यथा होईल मोठं नुकसान)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजची दखल घेतली असता, हा फेक मेसेज असल्याचे आढळून आले. UIDAI ने स्वतः आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर केलेल्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, हा फेक अलर्ट आहे. त्याकडे दुर्लक्ष करा आणि सावधगिरी बाळगा.

व्हायरल मेसेजमध्ये myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटची लिंकही फेक आहे. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटची लिंक uidai.gov.in आहे. जर तुम्ही एखाद्या बनावट वेबसाइटवर जाऊन तुमची महत्त्वाची आणि वैयक्तिक माहिती दिली तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif