सरकारी नोकरीच्या शोधात असणार्या तरूणांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून Combined Graduate Level (CGL) Examination 2021-22 परीक्षेचे नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे. विविध यामध्ये शासकीय विभागांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी वर्गातील पदं भरली जाणार आहेत. 23 डिसेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 23 जानेवारी 2022 पर्यंत एसएससीच्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर इच्छुक उमेदवार आपला अर्ज दाखल करू शकतात. हे देखील नक्की वाचा: MPSC State Service Prelims Exam Admit Card 2021: 2 जानेवारीला होणार्या राज्य सेवा पूर्व परीक्षा ची अॅडमीड कार्ड्स जारी; mpsconline.gov.in वरून अशी करा डाऊनलोड .
SSC CGL 2022 Exam बाबत महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्जासाठी अंतिम तारीख - 23 जानेवारी 2022
ऑनलाईन पेमंट साठी अंतिम तारीख - 25 जानेवारी 2022 (11.30 PM)
ऑफलाईन चलान बनवण्यासाठी अंतिम तारीख - 26 जानेवारी 2022 (11.30 PM)
चलान द्वारे फी भरण्याची अंतिम तारीख - 27 जानेवारी 2022 (बॅंकेच्या कार्यकालीन वेळेवर आधारित)
फॉर्म करेक्शनची अंतिम मुदत - 28 जानेवारी 2022
SSC CGL 2022 Tier-1 परीक्षा - एप्रिल 2022
SSC CGL 2021-22 Tier 1 Exam साठी कसा कराल ऑनलाईन अर्ज?
- SSC ची अधिकृत संकेतस्थळ ssc.nic.in वर क्लिक करा.
- होम पेज वर ‘Combined Level Examination 2021-22 recruitment notification’वर क्लिक करा.
- उमेदवारांना सारे तपशील भरून स्वतःला रजिस्टर करावं लागणार आहे.
- नंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरा.
- सारे आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि अॅप्लिकेशन फी भरा.
- SSC CGL 2021-22 Form नीट तपासून नंतर डाऊनलोड करून ठेवा.
SSC Tweet
SSC CGL : कर्मचारी चयन आयोग (SSC) ने CGL 2021 का नोटिफिकेशन जारी कर दिया है। अभ्यर्थी SSC की आधिकारिक वेबसाइट https://t.co/Nqjcr9jTZr पर 23 जनवरी 2022 तक आवेदन कर सकते हैं। SSC CGL 2021 की टायर-1 परीक्षा (CBT) अप्रैल 2022 में आयोजित होगी। pic.twitter.com/g0OZqsoH2B
— staff selection commission of India (@ssc_official__) December 24, 2021
ग्रेड पे 2400 ते 4800 पर्यंत विविध विविध वयोगटांमध्ये आणि पदांवर ही नोकरभरती केली जाणार आहे. SSC CGL 2022 ची पदं वयवर्ष 18-27 वर्ष, 20-30 वर्ष, 18-30 वर्ष, 18-32 वर्ष या चार वयोगटांमध्ये विभागली आहेत. दरम्यान विविध आरक्षणांनुसार वयोमर्यादेची सूट उमेदवारांसाठी लागू असणार आहे. ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट च्या स्वरूपात होणार आहे.