Shocking Viral Video: घृणास्पद कृत्य! मोलकरीण 8 वर्षे जेवणात मिसळत होती आपली लघवी, संपूर्ण कुटुंब आजारी पडल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार (व्हिडीओ)

गाझियाबादच्या थाना क्रॉसिंग रिपब्लिक परिसरातील एका सोसायटीत ही घटना घडली. यानंतर व्यावसायिकाने मोलकरणीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मोलकरीण 8 वर्षे जेवणात मिसळत होती आपली लघवी

यूपीमधील योगी सरकार अन्नपदार्थांमध्ये थुंकणे किंवा इतर खाण्यायोग्य नसणारे पदार्थ मिसळणे यासारख्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा आणणार आहे. अशात आता गाझियाबादमध्ये (Ghaziabad) एका मोलकरणीचे एक घृणास्पद कृत्य समोर आले आहे, जे ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. मोलकरीण एका व्यावसायिकाच्या घरात काम करत असताना, कणिक मळताना पिठात आपली लघवी मिक्स करत होती. या लघवी मिसळलेल्या पिठाच्या चपात्या बनवून ती कुटुंबाला खायला देत होती. कुटुंबाला अन्नाबाबत संशय आल्याने त्यांनी स्वयंपाकघरात एक मोबाईल फोन ठेवला, त्यानंतर मोलकरणीचे हे लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मोलकरणीला अटक केली आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे मोलकरीण आठ वर्षांपासून या व्यावसायिकाच्या घरात काम करत आहे. अहवालानुसार, कुटुंबातील सदस्य अनेक महिन्यांपासून पोट आणि यकृताच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांची प्रकृती बिघडत होती. सुरुवातीला त्यांना वाटले की, हा एक सामान्य संसर्ग आहे, परंतु जेव्हा त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली नाही, तेव्हा त्यांना आपल्या आहाराबद्दल संशय आला. त्यांनी किचनमध्ये फोन ठेवला.

त्यानंतर फुटेजमध्ये मोलकरीण रीना पीठ मळत असताना त्यात लघवी मिसळत असल्याचे दिसून आले. गाझियाबादच्या थाना क्रॉसिंग रिपब्लिक परिसरातील एका सोसायटीत ही घटना घडली. यानंतर व्यावसायिकाने मोलकरणीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेबाबत डीसीपी सुरेंद्र नाथ तिवारी यांनी सांगितले की, क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस ठाण्यात तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मोलकरीण रीनाला अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा : Viral video: गाझियाबादमध्ये श्री धारा डेअरीमधून विकत घेतलेल्या सामोश्यामध्ये आढळले मृत स्पायडर, व्हिडीओ व्हायरल)

मोलकरीण 8 वर्षे जेवणात मिसळत होती आपली लघवी-

सोमवारी, 14 ऑक्टोबर रोजी, फुटेजमध्ये ती स्वयंपाकाच्या भांड्यात लघवी करताना आणि अन्न तयार करण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करत असल्याचे दिसून आले. चौकशीदरम्यान रीनाने सुरुवातीला आरोप फेटाळून लावले. मात्र, व्हिडिओ फुटेज दाखवल्यावर ती गप्प राहिली, पुराव्याचे खंडन करू शकली नाही. या घटनेने घरगुती मदतनीसांची नेमणूक करताना सावधगिरी आणि पार्श्वभूमी तपासण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.