TRAI New DTH Rules: निवडीचे स्वातंत्र्य घ्या! अन्यथा तुमचा आवडता टीव्ही चॅनल होईल बंद
प्राप्त माहितीनुसार, आता ग्राहकांकडे काहीच दिवस शिल्लख आहेत. ज्यात लोक आपले पॅक ठरवू शकतात. डीटीएच (यायरेक्ट टू होम) कंपन्या आणि लोकल केबल ऑपरेटर यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या पॅकनुसारही लोक स्वीकारु शकता. तुम्ही निवडलेले नवे चॅनल त्या पॅकमध्ये समाविष्ठ करण्यात येतील.
TRAI New DTH Rules: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India) ने जारी केलेले नवे नियम आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारी 2019 पासून लागू होत आहेत. या नियमांनुसार नागरिकांना आपल्या आवडीच्या वाहिन्या प्राधान्याने निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. दरम्यान, ट्रायच्या नियमांनुसार काही वाहिन्या 'फ्री टू एअर चॅनल' ( Free To Air Channel List) या संकल्पनेनुसार मोफतही पाहता येणार आहेत. मात्र, यातील जवळपास 27 वाहिन्या या सरकारी असतील. या व्यतिरिक्त तुम्हाला इतरही काही चॅनल्स (वाहन्या) पाहायचे असतील. तर, त्यासाठी लागणारे अतिरिक्त शुल्क भरुन तुम्ही या वाहिन्या पाहू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या डीटीएच ऑपरेटर किंवा केबल ऑपरेटर सर्विस (Cable Tv And Dth Service) यांच्याशी संपर्क करु शकता. या चॅनल निवडीचे स्वातंत्र्य ट्रायच्या (TRAI) नियमानुसार तुम्हाला घ्यावेच लागणार आहे. अन्यथा तुमचा केबल अथवा डीटीएच ऑपरेटर तुमचे आवडते चॅनल बंद करु शकतो.
प्राप्त माहितीनुसार, आता ग्राहकांकडे काहीच दिवस शिल्लख आहेत. ज्यात लोक आपले पॅक ठरवू शकतात. डीटीएच (यायरेक्ट टू होम) कंपन्या आणि लोकल केबल ऑपरेटर यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या पॅकनुसारही लोक स्वीकारु शकता. तुम्ही निवडलेले नवे चॅनल त्या पॅकमध्ये समाविष्ठ करण्यात येतील.
बेसीक पॅकमध्ये 100 चॅनल निशुल्क
ट्रायच्या नव्या नियमानुसार डीटीएच कंपन्या आणि लोकल केबल ऑपरेटर ग्राहकांना बेस पॅकबाबत माहिती देतील. त्यासोबतच चॅनल कशा पद्धतीने निवडायचे याचीही माहिती देतील. बेस पॅकमद्ये 100 चॅनल्सचा समावेश असेल. ज्यात दूरदर्शन आणि सरकारचे 25 चॅनल बंधनकारक असतील. याचे किमान शुल्क 130 रुपयांपर्यंत पोहोचेल. जीएसटीसह ही रक्कम 154 रुपयांपर्यंत जाईल. या व्यतिरीक्त जर एखादी व्यक्ती एखादा चॅनल निवडत असेल तर त्यासाठी तिला वेगळे शुल्क द्यावे लागेल. त्याचा स्लॉटही वेगळा असेल. एका स्लॉटमध्ये 25 पेक्षा अधिक चॅनल असणार नाहीत.
एका स्लॉटसाठी 20 रुपये वेगळे आकारण्यात येतील. ही रक्कम कंपन्यांच्या नेटवर्क कपॅसिटी शुल्क या नावाने आकारण्यात येतील. बेस पॅकशिवाय अतिरिक्त जे चॅनल असतील त्याचे शुल्क बेस पॅकसोबत जोडण्यात येईल. (हेही वाचा, DTH वापरत असाल तर करा 'हे' काम, TRAI कडून आजचा शेवटचा दिवस)
प्रीपेड रीचार्ज कामी येईल
ज्या लोकांनी डीटीएच एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी आगोदरच रिचार्ज केले आहे. त्या मंडळींचे पैसे बेस पॅकसोबत जोडून पॅक तयार करता येतील. ट्रायने ग्राहकांना विश्वास दिला आहे की, 1 फेब्रुवारी पर्यंत नियमानुसार पॅक निवडला नाही तरीही काही हरकत नाही. तीन-चार दिवसांत लोक पॅक निवडू शकतात. या कालावधीत पूर्वीप्रमाणे कार्यक्रम पाहता येतील.
एक फेब्रुवारीपूर्वी चॅनलसाठी जो रिचार्ज केला असेल तो काम करेन. आणि नवा पॅक त्याच्यासोबत जोडला जाईल. जर टीटीएच ऑपरेटरला वाटले की, आपला बॅलन्स ट्रायच्या नियमानुसार नाही तर तो, ग्राहकांना फोन किंवा मेसेज करुन तसे कळवेल. त्यानंतर संबंधीत ग्राहक कस्टमर केअरशी संपर्क करुन त्याला हवा तो पॅक निवडू शकेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)