Sunny Leone किंवा Mahendra Singh Dhoni यांच्याबद्दल सर्च करणे पडू शकते महागात; तेव्हा राहा जरा सावध

परंतु तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की हीच नावं ठरली आहेत धोकादायक.

Sunny Leone, Mahendra Singh Dhoni (Photo Credits: Facebook)

जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी सचिन तेंडुलकर, सनी लिओनी, महेंद्रसिंग धोनी, पी व्ही सिंधू ही नावं प्रसिद्ध आहेत. परंतु तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की हीच नावं ठरली आहेत धोकादायक.

गूगलवर आपण अनेक गोष्टी दिवसभरात सर्च करत असतो. आणि गूगलच्या रिपोर्टनुसार सनी लिओनी आणि महेंद्रसिंग धोनी ही नावे तर सर्च यादीत आग्रास्थानी आहेत. परंतु हीच नावं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात कारण मॅकफे (McAfee) या कंपनीने केलेल्या एका रिसर्च रिपोर्टनुसार ही नावे तुमच्या कम्प्युटरला नुकसान पोहोचवू शकतात.

मॅकफे कंपनीने सर्वात धोकादायक सेलिब्रिटी यांची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत आपल्याला अनेक दिग्गज खेळाडूंपासून बॉलीवूडच्या सेलिब्रिटींपर्यंत अनेक नावे आहेत. आणि तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की या सेलिब्रिटींचे नाव सर्च केल्यानंतर व्हायरस असलेली नवी वेबसाईट आपोआप ओपन होते आणि या व्हायरसने तुमच्या कम्प्युटरला हानी पोहोचू शकते.

Forbes Rich List 2019: मुकेश अंबानी सलग 12 वेळा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पाहा टॉप 10 श्रीमंतांची यादी

यादीतील सर्वात पाहिलं नाव जे समोर आलं आहे ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी तर दुसऱ्या स्थानी आहे सचिन तेंडुलकर हे नाव. याचसोबत खेळ विश्वातील फुटबॉलपटू ख्रिस्तायानो रोनाल्डो हे नाव देखील या यादीत पाहायला मिळते. तर सेलिब्रिटींच्या यादीत बिग बॉस विजेता गौतम गुलाटी, बॉलिवुड अभिनेत्री सनी लिओनी, पॉप सिंगर बादशाह, राधिका आपटे आणि श्रद्धा कपूरही आहेत.

पाहा टॉप 10 धोकादायक नावे

1. महेंद्रसिंग धोनी

2. सचिन तेंडुलकर

3. गौतम गुलाटी

4. सनी लिओनी

5. बादशाह

6. राधिका आपटे

7. श्रध्दा कपूर

8. हरमनप्रीत कौर

9. पीव्ही सिंधू

10. ख्रिस्तियानो रोनाल्डो