SBI चं कर्ज होणार स्वस्त; 1 जुलैपासून कर्जदारांना मिळणार लाभ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट कमी केल्यानंतर एसबीआयने देखील ग्राहकांसाठी खुशखबर घेऊन आलं आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) रेपो रेट (Repo Rate) कमी केल्यानंतर एसबीआयने (SBI) देखील ग्राहकांसाठी खुशखबर घेऊन आलं आहे. एसबीआय मार्च 2019 मध्ये सेव्हिंग्स डिपॉजिट आणि कर्जाच्या दरांना RBIच्या रेपो रेटशी जोडणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये झालेल्या कपातीचा फायदा SBI मधून कर्ज घेतलेल्या ग्राहाकांना होणार आहे. 1 जुलैपासून ग्राहकांना या सुविधेचा फायदा मिळणार आहे.एक लाखाहून अधिक ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरावर हा नवा नियम लागू होईल.

रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वीच रेपो रेटमध्ये पाव टक्कांनी कपात केली. त्यानंतर एसबीआयसह अन्य बँकांनीही गृहकर्ज आणि वाहन कर्जातील व्याजदरात कपात केली होती. (गृहकर्ज, वाहन कर्ज होणार स्वस्त, RBI ची सर्वसामान्यांना भेट)

स्टेट बँक ऑफ इंडियाने तर MCLR मध्ये बदल केला. बँकांसाठी कर्ज व्याजदर निश्चित करण्यासाठी असलेल्या पद्धतीला मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड लँडिंग रेट (एमसीएलआर) म्हणतात. यामुळे व्याजदर प्रक्रियेत पारदर्शकता येऊन कर्जदारांना याचा फायदा होतो.