SBI Recruitment 2022: एसबीआय मध्ये Specialist Cadre Officer साठी होणार नोकरभरती; sbi.co.in वर करा 4 मे पूर्वी अर्ज
यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India) कडून specialist cadre officer पदासाठी 11 जागांवर नोकरभरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. ते सादर करण्याची अंतिम तारीख 4 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज sbi.co.in या एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर सादर करायचा आहे. एसबीआय मध्ये Vice President & Head (Contact Centre Transformation) साठी 1, Senior Special Executive Program Manager Contact Centre साठी 4, Senior Special Executive Customer experience, Training & Scripts Manager (Inbound & Outbound) साठी 2, Senior Special Executive Command Centre Manager साठी 3, Senior Special Executive- Dialler Operations (Outbound) साठी एका पदावर नोकरभरती होणार आहे. इथे पहा नोकरभरतीचं सविस्तर नोटिफिकेशन .
कसा सादर कराल अर्ज?
- स्टेट बॅंक ऑफ इंडियाची वेबसाईट sbi.co.in ला भेट द्या.
- होमपेज वरील “Careers” च्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर “Current Openings” च्या टॅब वर क्लिक करा.
- Apply Online link चा पर्याय निवडा.
- रजिस्टर करा.
- अॅप्लिकेशन फॉर्म भरा.
- तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा.
- अॅप्लिकेशन फी भरा.
- आता फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट घेऊन ठेवा.
अर्ज करण्यासाठी या थेट लिंकवरही तुम्ही क्लिक करू शकता.
दरम्यान जनरल, ओबीसी, ईडब्लूएस उमेदवारांना 750 रूपये नॉन रिफेंडेबल शुल्क असणार आहे. एससी,एसटी आणि पीडब्लूडी उमेदवारांना शुल्क लागू नसेल.