SBI Recruitment 2019: स्टेट बँक ऑफ इंडिया भरणार Probationary Officer पदासाठी 2000 जागा; सरकारी नोकरीची मोठी संधी
या पदांसाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे परीक्षा घेतली जाईल. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.sbi.co.in या संकेत स्थळाला भेट द्या.
SBI Recruitment 2019: सरकारी नोकरी त्यातही बँकींग क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या मंडळींसाठी अत्यंत मोठी बातमी आहे. एसबीआय (SBI)अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) तब्बल 2000 हजार पदांची भरती करणार आहे. ही भरती प्रेबेशनरी ऑफिसर पदांसाठी आहे. एसबीआयने त्याबाबत जाहीरातही दिली आहे. जे लोक बँकींग क्षेत्रात करिअर बनवू इच्छितात त्यांच्यासाठी नोकरीची सुवर्ण संधी असणार आहे. अर्ज करण्यासाठी तपशील सविस्तर जाणून घ्या.
एसबीआयने दिलेल्या जाहिरातीनुसार, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत 22 एप्रिल पर्यंत आहे. या पदांसाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे परीक्षा घेतली जाईल. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.sbi.co.in या संकेत स्थळाला भेट द्या.
एकूण पदे आणि आरक्षण स्थिती
एसबीआयने पीओ पदासाठी 2000 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यात खुल्या गटासाठी 810 जागा, एससी - 300, एसटी - 150, ओबीसी - 540, ईडब्ल्यूएस - 200 आणि पीडब्ल्यूडी 118 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
अर्ज करण्याची अंतीम तारीख आणि शुल्क
प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी अर्जदार 22 एप्रिल 2019 या तारखेपर्यंत अर्ज करु शकतात. अर्जदारांना या तारखेपर्यंतच विहीत शुल्क जमा करायचे आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्या कॉल लेटर्स (एडमिट कार्ड ) पाठवली जातील. ही लेटर्स तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे डाऊनलोडही करु शकता. दरम्यान, अर्जासोबत अर्जशुल्कही अर्जदारांनी जमा करावयाचे आहे. खुल्या वर्गासाठी अर्ज फी 750 रुपये तर एससी/एसटी/पीक्यूडी वर्गासाठी हे शुल्क 150 रुपये इतके असणार आहे. अर्जदारांनी हे शुल्कही ऑनलाईन प्रक्रियेद्वारेच भरायचे आहे.
शैक्षणीक पात्रता
एसबीआय पीओ पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी 21 वर्षे तर, जास्तीत जास्त 30 वर्षे इतके असावे. अर्जदार आरक्षीत वर्गातील असेल तर नियमानुसार त्याला असलेली वयात सवलत दिली जाईल. अर्जदार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. जे लोक पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतील त्या अर्जदारांना पदवीनंतर पदवी उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.
निवड प्रक्रिया
दरम्यान, अर्जदार 22 एप्रिल 2019 पर्यंत अर्ज करु शकतात. कॉल लेटर मे महिन्याच्या शेवटच्या महिन्यात जारी होऊ शकते. प्राथमिक परीक्षेचे आयोजन 8,9,15 आणि 16 जून या तारखांना करण्यात आले आहे. प्राथमिक परीक्षेचा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जईल. (हेही वाचा, काय नोकरी आहे ? येथे कामादरम्यान झोपण्याची आहे पूर्ण मूभा !)
अंतिम निकाल
प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेला सामोरे जाता येईल. मुख्य परीक्षेचे अॅडमिट कार्ड जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केले जाईल. मुख्य परीक्षेचे आयोजन 20 जुलै रोजी करण्यात येईल. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या तीसऱ्या आठवड्यात मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्याबाबतचे कॉल लेटर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जारी केले जाईल. शेवटी ग्रुप डिस्कशन आणि अंतीम मुलाखत घेतली जाईल. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पीओचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल.