SBI Mega e-auction: देशभरातील मालमत्तांचा एसबीआयकडून ई-लिलाव; सहभागी होण्यासाठी फॉलो करा 'या' स्टेप्स
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) 25 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक आणि निवासी गहाण मालमत्तांसाठी ई-लिलाव (e-auction) आयोजित केला आहे. एसबीआय मेगा ई-लिलाव (Mega e-auction) अंतर्गत तुम्हाला सध्याच्या बाजार दरापेक्षा कमी किंमतीत घर, प्लॉट आणि दुकानावर बोली लावण्याची आणि जिंकण्याची संधी आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ने 25 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक आणि निवासी गहाण मालमत्तांसाठी ई-लिलाव (e-auction) आयोजित केला आहे. एसबीआय (SBI) मेगा ई-लिलाव (Mega e-auction) अंतर्गत तुम्हाला सध्याच्या बाजार दरापेक्षा कमी किंमतीत घर, प्लॉट आणि दुकानावर बोली लावण्याची आणि जिंकण्याची संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टर सादर करत यासंदर्भात माहिती दिली. "तुमची पुढील मोठी गुंतवणुकीची संधी येथे आहे! ई-लिलावादरम्यान आमच्यात सामील व्हा आणि तुमची सर्वोत्तम बोली लावा," असा मजकूर पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. बँकेची थकबाकी वसूल करण्यासाठी थकबाकीदारांच्या गहाण मालमत्ता या ई-लिलावमध्ये बोलीसाठी उपलब्ध असणार आहेत. (Fake News Alert: SBI ग्राहकांना येत आहेत YONO अकाउंट ब्लॉक केल्याचे खोटे मेसेज; PIB Fact Check ने केला 'हा' खुलासा)
एसबीआय ई-लिलावात सहभागी होण्यासाठीची पात्रता:
1) ई-लिलाव नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे मालमत्तेसाठी EMD.
2) KYC कागदपत्र संबंधित एसबीआय शाखेत सादर करणे आवश्यक आहे.
3) वैध डिजिटल स्वाक्षरी: डिजिटल स्वाक्षरी मिळवण्यासाठी बोलीदार ई-लिलावदार किंवा इतर कोणत्याही अधिकृत एजन्सीशी संपर्क साधू शकतात.
4) बोलीदारांनी EMD डिपॉझिट आणि KYC कागदपत्र संबंधित शाखेकडे जमा केल्यानंतर, त्यांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड ईमेल आयडीद्वारे पाठवले जातील.
5) बोलीदारांनी लिलाव नियमांनुसार ई-लिलावाच्या तारखेला ठरवलेल्या वेळेमध्ये लॉग इन करणे आणि बोली लावणे आवश्यक आहे.
बोलीत सहभागी होण्यासाठी स्टेप्स:
1) बोलीदारांनी नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉग इन करणे आवश्यक आहे.
2) एकदा निविदाकाराने अटी आणि शर्ती स्वीकारल्यानंतर त्यांना लिलाव प्रविष्ट करण्यासाठी 'participate' बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
3) 'participate' बटणावर क्लिक केल्यानंतर बोलीदारांना KYC कागदपत्र, ईएमडी तपशील आणि FRQ (First Rate Quote) अपलोड करावे लागतील.
4) सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर, बोलीदाराने बोलीची किंमत सादर करावी. बोलीची किंमत मालमत्ता किंवा मालमत्तेच्या आरक्षित मूल्यापेक्षा समान किंवा जास्त असू शकते.
5) बोलीची अंतिम किंमत भरल्यानंतर, 'submit' पर्यायावर क्लिक करा आणि नंतर 'final submit' वर क्लिक करा.
अपलोड केलेल्या कागदपत्रांमध्ये किंवा बोलीच्या अंतिम किंमतीमध्ये बदल करू शकत नाही. जर बोलीदार निर्धारित तारीख आणि वेळेत 'final submit' बटणावर क्लिक करण्यात अयशस्वी झाले तर ते लिलावात सहभागी होऊ शकणार नाहीत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)