1 डिसेंबर पूर्वी SBI बॅंकेत ही '4' कामं उरका नाहीतर मोठं नुकसान !
बॅंकेच्या नेटबॅंकिंगची सुविधा वापरायची असेल तर 30 नोव्हेंबरपर्यंत मोबाईल क्रमांक लिंक करणं गरजेचे आहे अन्यथा बॅंकेकडून नेटबॅंकिंग ब्लॉक केले जाणार आहे.
आजकाल बॅंकेची निम्म्याहून अधिक कामं ही घरबसल्या नेटबॅंकिंग(Net banking) किंवा मोबाईल अॅप, मोबाईल बॅंकिंगच्या माध्यमातून होतात. पण तुमचं SBI बॅंकेमध्ये अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी पुढचे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण RBI च्या नियमावलीनुसार, इंटरनेट बॅंकिंगचा (SBI Internet Banking) वापर करणार्यांना त्यांचा मोबाईल क्रमांक (Mobile Number) बॅंक अकाऊंटसोबत (Bank Account) लिंक करणं अनिवार्य आहे. बॅंकेच्या नेटबॅंकिंगची सुविधा वापरायची असेल तर 30 नोव्हेंबरपर्यंत मोबाईल क्रमांक लिंक करणं गरजेचे आहे अन्यथा बॅंकेकडून नेटबॅंकिंग ब्लॉक केले जाणार आहे. सोबतच SBI च अॅपही बंद होत असल्याने काही ग्राहक धास्तावले आहेत. मग पहा पुढील तीन दिवसात तुम्हांला कोणकोणती बॅंकेची काम आवरणं अत्यावश्यकच आहे.
1.अकाऊंटसोबत मोबाईल क्रमांक लिंक करा
30 नोव्हेंबरपर्यंत मोबाईल क्रमांक लिंक झालेला नसेल तर नेटबॅंकिंग ब्लॉक होईल.
मोबाईल क्रमांक अकाऊंट नंबरसोबत लिंक कसा कराल ?
इंटरनेट बॅंकिंग सर्व्हिसवर लॉग ऑन करा.
My Accounts मध्ये क्लिक करा, त्यानंतर प्रोफाईल टॅबवर क्लिक करा,
प्रोफाईलमध्ये Personal Details/Mobile वर क्लिक करांऐवजी
प्रोफाईल पासवर्डवर क्लिक करा.
तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असेल तर तो स्क्रिनवर दिसणार आहे. मात्र रजिस्टर नसेल तर नजीकच्या SBI ब्रॅन्चला संपर्क साधा.
2. जीवनप्रमाण पत्रक सादर करणं
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये पेंशनधारकांना जीवनप्रमाणपत्रक सादर करणं अत्यावश्यक आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत जीवनप्रमाणपत्र सादर न केल्यास खातं बंद होण्याची शक्यता असते. तसेच पेंशनही खात्यामध्ये जमा केली जात नाही.
ऑनलाईन किंवा बॅंकेमध्ये जाऊन जीवनप्रमाणपत्र जमा केले जाऊ शकते.
3. Buddy अॅप वॉलेटमध्ये रक्कम असल्यास काढा
1 डिसेंबरपासून मोबाईल वॉलेट असलेलं Buddy अॅप बंद करणार आहे. या अॅपमध्ये तुम्ही पैसे ठेवले असतील तर ते काढून घ्या किंवा योग्य ठिकाणी वापरा.
4. फेस्टिव्ह सीझनमध्ये कर्ज
पेंशनधारकांना कर्ज घेण्याची सोय घेऊन आले आहे. सुरूवातीच्या टप्प्यावर म्हणजे फेस्टिव्ह सीझनमध्ये पेंशनधारकांना प्रोसेसिंग फी माफ करण्यात आली आहे.
म्हणूनच तुमचं SBI बॅंकेमध्ये अकाऊंट असेल तर 30 नोव्हेंबरपर्यंत किमान ही कामं नक्की उरकून घ्यायला हवीत.