Rules Changing From 1st April: नव्या आर्थिक वर्षात बदलणार हे '6' नियम

काल 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2020-21 संपले. आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून अनेक नियमांमध्ये बदल होतील. त्यापैकी काही नियमांची घोषणा केंद्रीय बजेट 2021 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत केली होती.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

31 मार्च रोजी आर्थिक वर्ष (Financial Year) 2020-21 संपेल. उद्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून अनेक नियमांमध्ये बदल होतील. त्यापैकी काही नियमांची घोषणा केंद्रीय बजेट 2021 (Union Budget 2021) मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत केली होती. त्याचबरोबर टॅक्सपेयर्स (Taxpayers) अनेक महत्त्वपूर्ण कामे नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी करणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊया त्याविषयी आणि बदलणाऱ्या नियमांविषयी... (Income Tax विभागाला आधार कार्डचा क्रमांक न दिल्यास भरावा लागेल 'इतका' दंड, जाणून घ्या सविस्तर)

पॅन-आधार कार्ड लिकिंग ची मर्यादा समाप्त:

आधार-पॅन कार्ड एकमेकांशी जोडण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 आहे. प्राप्तिकर ई-फाईलिंग वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in वर जाऊन पॅन-आधार लिंक करता येईल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) 12 अंकी आधार नंबर जारी करतो तर आयकर विभाग कोणत्याही व्यक्तीला किंवा घटकास 10 अंकी पॅन जारी करण्यात येतो. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार जर ठरलेल्या कालावधीत पॅन आधारमध्ये जोडला गेला नाही तर तो निष्क्रिय होईल.(PAN-Aadhaar Linking चा आजचा शेवटचा दिवस; incometaxindiaefiling.gov.in साईट डाऊन मग SMSच्या माध्यमातून असे करा पॅन-आधार लिंक)

रिव्हाईज्ड आयटीआर ची मूदत समाप्त:

रिव्हाईज्ड आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 आहे. त्यानंतर तुम्ही आयटीआर मध्ये कोणताही बदल करु शकत नाही. आयटीआर रिटर्न दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये एकूण किती वेळ लागेल. यासंबंधिची अचूक माहिती केंद्राकडे उपलब्ध नाही. यामुळे कर विभागाच्या कार्यप्रणालीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

भविष्य निर्वाह निधी कर नियम:

1 एप्रिलपासून नवीन भविष्य निर्वाह निधी कर कायद्यानुसार केंद्र सरकार एका वर्षात अडीच लाखाहून अधिक रकमेच्या पीएफ योगदानावर भरलेल्या व्याजावर कर लावेल.

विवाद विश्वास स्कीम (Vivad Vishwas Scheme)

सरकारची विवाद विश्वास स्कीम 31 मार्च 2021 रोजी संपत आहे. या योजनेचे घोषणापत्र दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. या योजनेअंतर्गत अतिरिक्त व्याज वगळता तुम्ही टॅक्स भरु शकता. न्यायालयामध्ये करासंबंधित अडकलेल्या केसेस लवकर सोडवण्यासाठी आणि करदात्यांना विविध उपाय नेमून देण्यासाठी ही योजना 17 मार्च 2020 पासून अंमलात आणली होती.

75 वर्षांवरील नागरिकांना ITR भरण्याची गरज नाही

सरकारने नवीन बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये 75 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या पेन्शनधारकांना टॅक्स भरण्याची गरज नाही. या लाभासाठी त्यांची पेन्शन आणि त्यावर मिळणारे व्याज हे एकाच बँकेतील असावे.

बदलणारे नियम लक्षात घेऊन आजच काही कामे उरकावी लागतील. त्यामुळे अनेक समस्या टाळता येतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now