Rich Families: हे आहेत भारतातील टॉप 7 श्रीमंत कुटुंब, लक्झरी लाईफस्टाईलमुळे असतात नेहमीच चर्चेत
सध्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
भारतातील श्रीमंत उद्योगपती म्हटलं की, आपल्याला आठवतात ते अंबानी आणि अदानी. भारतातील श्रीमंत कुटुंबाच्या नावावर हे दोघे आघाडीवर असले तरी आहेत ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. आज भारतातील 7 श्रीमंत कुटुंबांबद्दलची माहिती आपण पाहू...
अंबानी कुटुंब
अंबानी कुटुंब (Ambani Family) हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक आहे. हे कुटुंब आपल्या आलिशान आणि लक्झरी लाईफस्टाईलमुळे कायम चर्चेत असतं. धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांचे पुत्र मुकेश अंबानी आणि त्यांच्या पुढच्या तिसऱ्या पिढी आकाश अंबानी, ईशा अंबानी, अनंत अंबानी यांनी हा व्यवसाय वाढवला आहे. सध्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
अदानी कुटुंब
गौतम अदानी (Gautam Adani) यांचा व्यवसाय विविध क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे आणि त्यांची मुले जीत आणि करण अदानी अदानी समूहाच्या विकासात सक्रियपणे सहभागी आहेत. गौतम अदानी यांच्या पत्नी प्रिती अदानी, अदानी फाऊंडेशनचे काम पाहतात.
गोदरेज कुटुंब
गोदरेज समूह ग्राहक उत्पादनांपासून रिअल इस्टेटपर्यंत सर्वत्र पसरला आहे. निसाबा गोदरेज गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सची देखरेख करतात, तर पिरोजशा गोदरेज गोदरेज प्रॉपर्टीज चालवतात.
टाटा कुटुंब
भारताच्या औद्योगिक परिस्थितीत टाटा कुटुंबाचं योगदान अतुलनीय आहे. जमशेदजी टाटा यांनी टाटा समुहाचा पाया घातला. त्यानंतर रतन टाटा यांनी अनेक आव्हानांना सामोरं जात टाटा समूहाचं नाव जगभरात पोहोचवलं.
बिर्ला कुटुंब
आदित्य बिर्ला (Aditya Birla) समूहाची स्थापना 1857 मध्ये झाली. सेठ शिव नारायण बिर्ला यांनी कापूस व्यवसायापासून आपला प्रवास सुरू केला. कुमार मंगलम बिर्ला आता धातू, सिमेंट, वित्त, दूरसंचार आणि इतर वैविध्यपूर्ण समूहाचे प्रमुख आहेत. कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला संगीत क्षेत्रात कार्यरत आहे.
बजाज कुटुंब
जमनालाल बजाज यांनी 1926 मध्ये बजाज समूहाची स्थापना केली. बजाज ऑटो ही प्रमुख कंपनी दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या निर्मितीमध्ये जागतिक स्तरावर ओळखली जाते.
मिस्त्री कुटुंब
मिस्त्री कुटुंबाच्या शापूरजी पालोनजी ग्रुपची स्थापना 1865 मध्ये झाली आहे. मिस्त्री हे बांधकाम, रिअल इस्टेट, वस्त्रोद्योग, शिपिंग आणि इतर अनेक क्षेत्रात पसरलेल्या समूहाचे प्रमुख आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)