RBI Recruitment 2021: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 10 वी पास असणाऱ्यांसाठी बंम्पर भरती; महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर माहिती

त्याचबरोबर जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सवलत आणि एसटी वर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सवलत देण्यात आली आहे.

RBI (Photo Credits: PTI)

RBI Recruitment 2021: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने कार्यालय परिचर (Office Attendant) च्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट rbi.gov.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 841पद भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आरबीआयने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचना वाचून अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जामध्ये त्रुटी किंवा कमतरता आढल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.

या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. विशेष म्हणजे या पदांवर बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवारदेखील अर्ज करू शकतात. पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकत नाहीत. (वाचा - ESIC Recruitment 2021: कर्मचारी राज्य विमा महामंडळाने 12 वी आणि पदवीधरांसाठी जारी केली भरती प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर)

निवड प्रक्रिया -

या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा व भाषा परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल.

वयाची अट -

या पदांवर अर्ज केलेल्या उमेदवाराचे कमाल वय 25 वर्षे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सवलत आणि एसटी वर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सवलत देण्यात आली आहे. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

महत्त्वाच्या तारखा -

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख - 24 फेब्रुवारी 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 15 मार्च 2021

ऑनलाईन परीक्षेची अपेक्षित तारीख - 9 किंवा 10 एप्रिल 2021

अर्जाची फी -

अर्ज करणाऱ्या सामान्य, ओबीसी वर्गातील आणि ईडब्ल्यूएसच्या उमेदवारांना 450 रुपये फी भरावी लागते. त्याचबरोबर एसटी आणि दिव्यांगसाठी 50 रुपये शुल्क निश्चित केले गेले आहे.