Driving License: ड्राइव्हिंग टेस्ट न देता आता घरबसल्या मिळवा फक्त 7 दिवसात चालक परवाना
Driving License (Photo Credit: PTI)

तुम्हाला ड्राईव्हिग लायसन्स (Driving License) काढायचं आहे? पण ते काढण्यास वेळ नाही किंवा अनेकदा तुम्ही ड्रायविंग टेस्ट (Driving Test) देवून देखील ती पास होणं शक्य होत नाही आहे. पण आम्ही तुम्हाला विना कुठली ड्राईव्हिंग टेस्ट देता चालक परवाना कसा मिळवाल या संबंधित काही टिप्स देणार आहोत. तुम्हाला ड्रायविंग लायसन्स म्हणजे चालक परवाना काढायचा असल्यास ड्रायविंग टेस्ट देणं अनिवार्य असतो. त्याशिवाय तुम्हाला ड्रायविंग लायसन्स मिळू शकत नाही. पण तुम्ही लर्निग लायसन्ससाठी (Learning Driving License) अप्लाय केल्यास तुम्हाला कुठलीही ड्रायविंग टेस्ट द्यायची गरज नाही. तर तुम्ही घरबसल्या https://parivahan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळास भेट देत तुमच्या लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय करु शकता. तर घरबसल्या अगदी सात दिवसांच्या आत तुमच्या हातात तुमचं हे लर्निग लायसन्स (Learning License) मिळेल. पण या लर्निग लासन्सच्या मदतीने तुम्ही फक्त विना गिअरची गाडी चालवू शकता.

 

लर्निंग लायसन्सच्या (Learning License) आधारे कुठलीही गिअरची गाडी चालवण्याची मुभा नाही. तुम्ही लर्निग लायसन्सच्या आधारे कुठलीही गिअरची गाडी चालवताना आढळल्यास तुम्हाला ट्रॉफिक पोलिस (Traffic Police) दंड आकारु शकतात. ह्या लायसन्सचा एक फायदा म्हणजे असाही की वाहन परवाना काढण्यासाठी तुमचं वय १८ वर्ष असणं बंधनकारक आहे. पण अगदी १६+ झाल्यावर देखील तुम्ही लर्निंग लायसन्स काढू शकता आणि विनागिअर गाडी रस्त्यावर चालवू शकता. (हे ही वाचा:- Aadhaar Card Update: तुमचं आधारकार्ड काढून किती वर्ष झालेत? आधारकार्ड काढून दहा वर्ष पुर्ण झाल्यास आधारकार्ड अपडेट करणं अनिवार्य)

 

पण हो चालक परवाना म्हणजे ड्रायविंग लायसन्स (Driving License) ज्यानुसार तुम्ही गिअरच्या गाड्या चालवू शकता त्यासाठी तुम्हाला ड्रायविंग टेस्ट देणंचं अनिवार्य आहे. विना ड्रायविंग टेस्ट चालक परवाना मिळू शकत नाही तसेच चालक परवाना मिळवण्यासाठी तुमचं वय 18+ असणं बंधनकारक आहे.