RBI ने जारी केले नवे नियम! तुमच्या पैशावर होणार थेट परिणाम; कधीपासून लागू होणार नवीन नियम? जाणून घ्या
हा नियम लागू झाल्यानंतर या क्षेत्रात सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.
RBI ने नॉन-बँकिंग फायनान्स म्हणजेच NBFC कंपन्यांसाठी कठोर नियम जारी केले आहेत. हे नियम लागू झाल्यानंतर NFBC कंपनीची स्थिती कशी आहे हे स्पष्टपणे कळेल. इन प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (PCA) नियम लागू केल्यानंतर, NBFC कंपनीची 3 वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर चाचणी केली जाईल. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...
या नियमानुसार, आता पहिल्या पॅरामीटरमध्ये अपयशी ठरल्यानंतर, रिझर्व्ह बँक NBFC चे लाभांश वितरण थांबवू शकते. एवढेचं नाही तर प्रवर्तकांनाही आरबीआय पैसे टाकण्यास सांगू शकते. त्याच वेळी, दुसऱ्या पॅरामीटरमध्ये अयशस्वी झाल्यास, आरबीआय कंपनीला नवीन शाखा उघडण्यास प्रतिबंध करू शकते आणि व्यवसायाचा विस्तार देखील थांबवू शकते. त्याच वेळी, तिसऱ्या पॅरामीटरमध्ये अयशस्वी झाल्यानंतर, रिझर्व्ह बँक एनबीएफसी कंपनीची स्थिती बरी होईपर्यंत व्यवसाय थांबवू शकते. (वाचा - पेटीएमचे CEO विजय शेखर शर्मा यांना जामीन मंजूर, डीसीपीच्या कारला टक्कर दिल्याप्रकरणी करण्यात आली होती अटक)
कधीपासून लागू होणार नियम ?
हे नवीन आणि कठोर नियम या वर्षी ऑक्टोबरपासून लागू होतील. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे एनजीएफसी क्षेत्राची स्थिती सुधारेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे नियम या क्षेत्रासाठी फायदेशीर ठरतील, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
वास्तविक, गेल्या 3 वर्षांत 4 मोठ्या एनबीएफसी कंपन्यांमध्ये अनेक अनियमितता समोर आल्या आहेत. हा नियम लागू झाल्यानंतर या क्षेत्रात सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. त्याच अपेक्षेने आरबीआयनेही हे नियम जारी केले आहेत.