IPL Auction 2025 Live

RBI Expanding India's UPI Reach: यूपीआय विस्तारासाठी आरबीआय प्रयत्नशील, मॉरिशस आणि इंडोनेशियाशी चर्चा सुरू

UPI जर आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तृतपणे स्वीकारला गेल्यास जागतिक पातळीवरही भारत आर्थिक केंद्र म्हणून नव्याने उदयास येईल, असा विश्वास आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत.

UPI,RBI | (Photo credit: archived, edited, representative image)

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) भारताच्या UPI पद्धतीचा विस्तार करण्यासाठी संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि इंडोनेशियाशी चर्चा करत आहे. UPI जर आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तृतपणे स्वीकारला गेल्यास जागतिक पातळीवरही भारत आर्थिक केंद्र म्हणून नव्याने उदयास येईल, असा विश्वास आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत. भारताचा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) देशाच्या आर्थीक पातळीवर एक विस्तृत आणि गेम-चेंजर म्हणून उदयास आला आहे. UPI ने भारतीय पेमेंट करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे, ज्यामुळे त्यांना एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित पैसे हस्तांतरित करता येतात.

दरम्यान, भारतातील यशस्वी कामगिरीनंतर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) भारताची UPI पद्धती अधिक विस्तृत करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि इंडोनेशियाशी चर्चा करत आहे. या हालचालीमध्ये जागतिक स्तरावर UPI ची पोहोच आणि वापर लक्षणीयरीत्या वाढवण्याची क्षमता आहे आणि त्याचबरोबर आर्थिक केंद्र म्हणून भारताची स्थिती बळकट होईल, असे आरबीआयने म्हटले आहे. (UPI Fraud: ऑनलाईन पेमेंट करताना सावधान! KYC, SIM आणि Bank च्या नावावर होऊ शकते फसवणूक)

यूपीआय म्हणजे काय?

UPI किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ही एक तात्काळ रीअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे. जी मोबाइल डिव्हाइसद्वारे बँक खात्यांमध्ये त्वरित पैसे हस्तांतरण सक्षम करते. 2016 मध्ये लाँच केलेला, UPI हा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चा एक उपक्रम आहे. RBI द्वारे त्याचे नियमन केले जाते. UPI भारतात कमालीचे लोकप्रिय झाले आहे, एकट्या जानेवारी २०२२ मध्ये २ अब्जाहून अधिक व्यवहार झाले आहेत. UPI ही एक संकल्पना आहे जी एकाधिक बँक खात्यांना एकाच मोबाइल ऍप्लिकेशनमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते. ही कल्पना नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केली आहे आणि आरबीआय आणि आयबीए (इंडियन बँक असोसिएशन) द्वारे नियंत्रित आहे.