रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना घेता येणार स्वादिष्ट भोजनाचा आनंद! देशातील 60 रेल्वे स्थानकांवर लवकरचं सुरू होणार RailRestro ची Food Service

बिहारची स्टार्टअप कंपनी RailRestro ने ट्रेनमध्ये जेवण पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

Railway Station ( Photo Credit -Wikimedia Commons)

RailRestro Food Service: रेल्वे ही देशातील सामान्य माणसाची जीवनवाहिनी (Lifeline) मानली जाते. दर महिन्याला लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. अशा स्थितीत रेल्वेच्या जेवणाबाबत सर्वाधिक समस्या प्रवाशांना भेडसावत आहेत. गेल्या काही वर्षांत रेल्वेने मोठे बदल केले असून त्यामुळे रेल्वे स्थानकावर (Railway Station) आणि ट्रेनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थाच्या दर्जात मोठी तफावत निर्माण झाली आहे.

जास्तीत जास्त लोकांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळावे हा रेल्वेचा प्रयत्न असतो. अनेक वेळा लोक ट्रेनमधून लांबचा प्रवास करतात. अशा वेळी घरून आणलेले अन्न एका दिवसापेक्षा जास्त टिकत नाही. (वाचा - Indian Railway Cancel Train List: वेगवेगळ्या कारणांमुळे रेल्वेने रद्द केल्या 513 गाड्या; घरातून बाहेर पडण्यापूर्वी 'येथे' पहा कॅन्सल गाड्यांची यादी)

RailRestro  देणार ट्रेनमधील प्रवाशांना जेवणाची सुविधा -

अशा परिस्थितीत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता RailRestro देशातील 50 ते 60 प्रमुख रेल्वे स्थानकांवरून ऑर्डरनुसार ट्रेनमध्ये जेवण पोहोचवेल. बिहारची स्टार्टअप कंपनी RailRestro ने ट्रेनमध्ये जेवण पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. कंपनी देशभरातील 50 ते 60 रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू करणार आहे. Railrestro कंपनीला इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) कडून मान्यता देण्यात यावी, अशी कंपनीला आशा आहे.

या स्थानकांवर उपलब्ध असेल खाद्यपदार्थ वितरणाची सुविधा -

RailRestro देशभरातील अनेक रेल्वे स्थानकांवर जेवणाची सुविधा पुरवेल. वृत्तानुसार, ओडिशातील भुवनेश्वर, लखनऊ, कानपूर, दीनदयाल उपाध्याय आणि उत्तर प्रदेशातील गोरखपूर, पश्चिम बंगालमधील आसनसोल आणि हावडा, राजस्थानमधील जयपूर, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, छत्तीसगडमधील तिरुपती, रायपूरमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय आणखी अनेक स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.