पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना: घरबसल्या पाहा तुम्हाला मिळणार का 6,000 रुपये?

म्हणजेच प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये शतकऱ्यांना मिळतील. या योजनेचा लाभ सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना होईल असा सरकारचा दावा आहे. या योजनेवर 75,000 कोटी रुपये खर्च होईल असा अंदाज आहे.

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana | (Photo credit: archived, edited, representative image)

शेतकरी सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारने एक नवे संकेतस्थळ (PM Kisan portal) सुरु केले आहे. या संकेतस्थळाला भेट देऊन आपणही या सन्मानाचे लाभधारी आहोत की नाही ये शेतकऱ्याला घरबसल्याही पाहता येणार आहे. शेतकरी सन्मान निधीमार्फत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक 6000 हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. ही योजना आणि त्याचा लाभ कोणाला मिळाला किंवा कसा मिळवायचा याबाबत अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

शेतकरी सन्मान निधी योजनेच्या संकेतस्थळबाबत सांगायचे तर, http://pmkisan.nic.in असा या संकेतस्थळाचा पत्ता आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक अशा इंटरनेट उपलब्ध होणाऱ्या कोणत्याही यंत्रणेमार्फत तुम्ही या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. या संकेतस्थळावर आपल्याला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीबाबत सर्व माहिती मिळू शकते.

या संकेतस्थळावर तुम्ही देशभरातील कोणकोणती राज्ये या योजनेचाल लाभ घेऊ शकतील हे जाणून घेऊ शकता. तसेच, या योजनेचाल लाभ मिळविण्यासठी सरकारकडून मदतही घेऊ शकता. सरकारने सर्व राज्यांना या संकेतस्थळावर आपल्या शेतकऱ्यांची नावेही द्यायला सांगितली आहेत. संकेतस्थळावर नाव अपडेट करण्याची शेवटची तारखी 25 फेब्रुवारी 2019 अशी आहे. म्हणजेच 25 फेब्रुवारी 2019 नंतर आपण आपले नाव या संकेतस्थलावर पाहू शकता. (हेही वाचा, Budget 2019 : पंतप्रधान मोदींकडून स्वागत, राहुल गांधी यांनी केली टीका; अर्थसंकल्पावर कोण काय म्हणाले?)

प्राप्त माहितीनुसार, हे 6000 रुपये तीन टप्प्यांत दिले जातील. म्हणजेच प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये शतकऱ्यांना मिळतील. या योजनेचा लाभ सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना होईल असा सरकारचा दावा आहे. या योजनेवर 75,000 कोटी रुपये खर्च होईल असा अंदाज आहे.