IPL Auction 2025 Live

PF Nomination Update: पीएफ धारकांना पूर्ण फायदा मिळवण्यासाठी EPF/EPS Nomination Online करणं गरजेचं; पहा स्टेप बाय स्टेप ते कसं कराल?

यंदा जून महिन्यात EDLI स्कीम अंतर्गत फायदा नोकरदार्‍यांसाठी 7 लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

EPFO (Photo Credits-Facebook)

देशभरातील नोकरदारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. नुकतीच EPFO कडून पीएफ धारकांना नोटीस देत एक आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी पीएफधारकांना e-Nomination करण्याचं आवाहन केले आहे. यामुळे अकाऊंट धारकांच्या फॅमिलीची सुरक्षितता राखली जाणार आहे. ईपीएफओ ने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून त्याची माहिती दिली आहे. त्यामध्ये दिलेला व्हिडिओ पाहून तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस पूर्ण करू शकता.नक्की वाचा: नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी! 15 दिवसात आटोपून घ्या 'हे' काम अन्यथा PF मधील पैसे अडकण्याची शक्यता.

यंदा जून महिन्यात EDLI स्कीम अंतर्गत फायदा नोकरदार्‍यांसाठी 7 लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे. EDLI हे आता नोकरदारांना insurance cover साठी बंधनकारक केले आहे. या स्कीम मध्ये जर नोकरदार व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना 7 लाखांची मदत मिळू शकते. किमान डेथ इंश्युरंस 2 लाख आहे. तर अप्पर लिमिट 6 लाख होता पण आता तो 2.5 लाख ते 7 लाख असा वाढण्यात आला आहे. ITR मध्ये पगार आणि PF ची माहिती देणार असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा.

EPF/EPS Nomination Digitally कसे कराल?

श्रम मंत्रालयाच्या माहितीनुसार, रजिस्टर किंवा नॉमिनेटेड फॅमिली मेंबरला 2 वर्षांसाठी अ‍ॅव्हरेज डेलि वेजेसच्या 90% रक्कम मिळणार आहे.