PAN Aadhaar Card Linking: दंड भरून तुमचं आधार कार्ड-पॅन कार्ड लिकिंग कसं कराल पूर्ण

तुम्ही 30 जूनपर्यंत 500 रुपयांमध्ये या दोन कागदपत्रांना लिंक करू शकता.

Aadhaar-PAN Linking |(Photo Credits: File Photo)

आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) ही आपल्यासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहेत. बँकेशी संबंधित कामांशिवाय इतर अनेक कामांसाठीही आधार कार्ड, पॅन कार्ड आवश्यक असतात. बँकेत खाते उघडण्यापासून ते गुंतवणुकीपर्यंत, घर खरेदीपर्यंत ही दोन्ही कागदपत्रे अनेक ठिकाणी आहेत. पॅनला आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. आधार लिंक न करता पॅन वापरणे आता अनेक ठिकाणी अवैध ठरले आहे. आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 होती.

आधार-पॅन लिकिंगची अंतिम तारीख उलटली आहे पण अद्यापही तुम्ही ते जोडले नसेल तर तुमच्यासाठी खालील माहिती आवश्यक आहे. अंतिम मुदत उलटली असली तरीही आता सशुल्क हे लिकिंग करता येणार आहे. 31 मार्चपर्यंत आधार-पॅन लिकिंग मोफत होते. आता 30 जूनपर्यंत पॅनला आधारशी लिंक केल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल आणि त्यानंतर दंडाची रक्कम 1,000 रुपये होईल. PAN Card Fraud: तुमच्या पॅन कार्ड नंबरचा गैरवापर करून कुणी कर्ज घेतलंय का? हे कसं घ्याल जाणून.

दंड भरून आधार-पॅन लिकिंग कसं कराल?

तुम्ही अद्याप आधारशी पॅन लिंक केले नसेल, तरीही तुम्हाला कमी दंड भरून असे करण्याची संधी आहे. तुम्ही 30 जूनपर्यंत 500 रुपयांमध्ये या दोन कागदपत्रांना लिंक करू शकता.