Option For 2000 Rupees Exchange: दोन हजारांची नोट बदलण्यासाठी नागरिकांची शक्कल, बँकेत गर्दी टाळण्यासाठी पेट्रोल पंप, स्वीगी, झोमॅटोसह इतर पर्यायांचा वापर

₹2,000 Currency Notes | (File Image)

दोन हजार रुपयांची नोट (Option For 2000 Rupees Exchange) चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) द्वारे जाहीर करण्यात आला आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. दोन हजार रुपयांची नोट मागे घेण्याचा निर्णय म्हणजे नोटबंदी नव्हे तर 'क्लीन नोट पॉलिसी' (Clean Note Policy) अंतर्गत घेतलेला निर्णय आहे, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. तरीही नागरिकांमध्ये काहीशी तणावाची स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी ₹2,000 Currency Notes बदलण्यासाठी वेगवेगळे पर्याय वापरण्यास सुरुवात केली आहे.

आरबीआयने सांगितल्या प्रमाणे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार दोन हजार रुपयांची नोट बदलून घेणे सोपे आहे. त्यासाठी बँकेत आपल्याला कोणत्याही प्रकारची ओळख, आधार क्रमांक अथवा पॅन क्रमांक देण्याची आवश्यकत नाही. असे असले तरी नागरिकांना बँकेत जाऊन नोट बदलून घेण्यापेक्षा इतर पर्याय जवळ वाटत असल्याचे पुढे आले. लाईव्हमिंटने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, अनेक लोक, पेट्रोल पंप, स्वीगी, झोमॅटो यांसारखे पर्याय दोन हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी वापरताना आढळून आले आहेत. खास करुन दिल्ली, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये पेट्रोल पंप, स्वीगी, झोमॅटो आदी ठिकाणांहून नोट बदलण्याचे प्रमाण वाढल्याचे पुढे आले आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रातील किमान सहा डीलर्सनी सांगितले की, रोख व्यवहारांमध्ये अचानक वाढ झाली आहे. (हेही वाचा, आजपासून बॅंकेमध्ये 2000 च्या नोटा बदलून मिळणार; बॅंकेमध्ये जाण्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी!)

आजपासून नोट बदलून देण्यास प्रारंभ

आरबीआयने दोन हजार रुपयांनीच नोट बँकांमध्ये बदलून देण्याच्या प्रक्रियेला आजपासून अधिकृतपणे सुरुवात होत आहे. दिनांक 23 मे पासून 30 सप्टेंबर या काळात नोटा बँकेद्वारे बदलून मिळणार आहेत.दरम्यान, आरबीआयने म्हटले आहे की, 2,000 रुपयांच्या नोटा एकतर बँक खात्यांमध्ये जमा केल्या जाऊ शकतात किंवा इतर चलनातून बदलल्या जाऊ शकतात. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बँकांना नोट बदलीसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आरबीआयने पुढे म्हटले आहे की, ₹ 2,000 ची नोट चलनातून काढून टाकण्यात आली आहे. परंतु ती कायदेशीर निविदा म्हणून सुरू राहील.