BHEL Recruitment 2022: 'भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड'मध्ये 61 ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी; 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज
ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असावेत.
BHEL Recruitment 2022: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ने 61 ITI ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार UPPCL jhs.bhel.com च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी 3मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 मार्च 2022 आहे.
वयाची अट -
01 एप्रिल 2022 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात 5 वर्षांची सूट आहे. (वाचा - PCMC Recruitment 2022: आरोग्य सेविका पदावर होणार थेट मुलाखती द्वारा नोकरभरती; इथे पहा सविस्तर अर्ज प्रक्रिया)
महत्त्वाच्या तारखा -
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख - 3 मार्च 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 मार्च 2022
ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असावेत. याशिवाय उमेदवाराने SCVT/NCVT द्वारे मान्यताप्राप्त ट्रेडमधील ITI केलेले असावे. निवडलेल्या उमेदवारांना 7700 रुपये ते 8050 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2022 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

