New Rules in 2023: क्रेडीट कार्ड, बँक लॉकर, आधार-पॅन लिंक यांसह अनेक नियमांमध्ये 1 जानेवारी 2023 पासून महत्त्वाचे बदल, घ्या जाणून

या बदलांबाबत घ्या अधिक जाणून.

Representational Picture. (Photo credits: Pixabay)

नव्या वर्षाचे स्वागत करताना नव्या बदलांबाबतही माहिती असणे आवश्यक आहेत. हे नवे बदल सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात अतिषय महत्वाचे ठरणार आहेत. हे बदल नव्या वर्षातील पहिल्याच दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून लागू असणार आहेत. प्रामुख्याने याचा भार तुमच्या खिशावर पडणार आहे.यात प्रामुख्याने यामध्ये क्रेडिट कार्ड (Credit Cards), बँक लॉकर्स (Bank Lockers), GST ई-इनव्हॉइसिंग (GST e-Invoicing), CNG-PNG किमती (CNG-PNG Prices) आणि वाहनांच्या किमतींशी (Vehicle prices) संबंधित बदलांचा समावेश आहे. या बदलांबाबत घ्या अधिक जाणून.

Card Eeward Points नियम बदलतील

क्रेडीट कार्ड निमयमांमध्येही 1 जानेवारी 2023 पासून महत्त्वाचे बदल होत आहेत. जे क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंटशी संबंधित आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून, HDFC बँक त्यांच्या क्रेडिट कार्ड पेमेंटवर उपलब्ध रिवॉर्ड पॉइंट्स बदलणार आहे. त्यामुळे, ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट कार्डमध्ये 31 डिसेंबर 2022 पूर्वी सर्व उर्वरित रिवॉर्ड पॉइंट्स भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 1 जानेवारी 2023 रिवॉर्ड पॉइंट सुविधा नवीन नियमांनुसार प्रदान केल्या जातील.

Petrol-Diesel and LPG दरांमध्ये बदल

सर्वसामान्य नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी दरांमध्ये 1 जानेवारी 2023 च्या सकाळीच बदल होण्याची शक्यता आहे. अर्थात पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. गेल्या काही काळापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर यात महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Small Saving Schemes Rate Hike: खुशखबर! सरकारने किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत, NSC आणि पोस्ट ऑफिस ठेव योजनांवर वाढवले व्याजदर)

वाहन खरेदी महागण्याची शक्यता

नव्या वर्षात तुम्ही जर नवे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही रक्कम अधिक खर्च करावी लागू शकते. सांगितले जात आहे की, नवीन वर्ष 2023 मध्ये नवीन वाहन खरेदी करणे महाग होऊ शकते. एमजी मोटर, मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर्स, होंडा, टाटा मोटर्स, रेनॉल्ट, ऑडी आणि मर्सिडीज-बेंझ या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. देशातील प्रमुख कंपनी टाटा मोटर्सने 2 जानेवारी 2023 पासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणार असल्याचे सांगितले आहे. होंडानेही आपल्या वाहनांच्या किमती 30,000 रुपयांनी वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन वर्षात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ती तुमच्या सध्याच्या कारपेक्षा महाग असू शकते.

बँक लॉकर नियमात बदल

आतापर्यंत बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवाण वस्तू, सामान अथवा इतर काही कागदपत्रे यांमध्ये काही बदल, चोरी, नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी बँक घेत नसे. तो भुर्दंड ग्राहकालाच सोसावा लागत होता. आता या नियमात आणि पद्धतीत बदल झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक लॉकर्सशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हे नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील. हे नियम लागू झाल्यानंतर, बँका यापुढे लॉकरच्या मुद्द्यावर ग्राहकांशी मनमानी व्यवहार करू शकणार नाहीत. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे काही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारीही बँकेची निश्चित केली जाईल. बँक आणि ग्राहक यांच्यात करार केला जाईल. जो 31 डिसेंबरपर्यंत वैध असेल. लॉकरशी संबंधित नियमांमधील बदलांची सर्व माहिती बँकांना एमएमएस आणि इतर माध्यमातून ग्राहकांना द्यावी लागेल.

Aadhar सोबत लिंक केले नाही तर PAN Card निष्क्रीय

आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पॅन कार्डबाबत महत्त्वाचा बदल होणार आहे. आपण जर वेळीच आधार कार्डसोबत पॅन कार्ड संलग्न केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रीय होऊ शकते. फक्त हा बदल नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी (1 जानेवारी) नव्हे तर एप्रिलच्या पहिल्या दिवसापासून लागू होणार आहे. आयकर विभागाने सार्वजनिक सल्लामसलत करताना सांगितले की, “पॅनला आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे, ते अनिवार्य आहे. उशीर करू नका, आजच लिंक करा!” प्राप्तिकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन धारकांना, जे सवलत श्रेणीत येत नाहीत, त्यांनी 31 मार्च 2023 पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. आधारपासून अनलिंक केलेले पॅन 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय केले जातील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif