New Rules From 1st January 2023: नियमांत बदल! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापूर्वीच करा ही कामे, नाहीर नंतर होईल त्रास

अन्यथा नव्या वर्षात नव्या नियमांमध्ये जुनी कामे पार पार पाडताना आपल्याला काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, त्याचा बोजा तुमच्या खिशावरही पडू शकतो. जाणून घ्या एक जानेवारी पासून नव्याने अमलात येणारे नियम आणि 31 डिसेंबरपासून संपुष्टात येणाऱ्या

Credit Card | Representational image (Photo Credits: pxhere)

New Rules From 1st January 2023: सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षात (New Year 2023) काही नवे बदल करण्याची आपली इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. सरत्या वर्षासोबत अनेक नियम आपले निरोप घेणार असून, नव्या वर्षात नव्या नियमांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जुन्या नियमांनुसार पार पाडता येणारी कामे सरत्या वर्षातच करा. अन्यथा नव्या वर्षात नव्या नियमांमध्ये जुनी कामे पार पार पाडताना आपल्याला काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, त्याचा बोजा तुमच्या खिशावरही पडू शकतो. जाणून घ्या एक जानेवारी पासून नव्याने अमलात येणारे नियम आणि 31 डिसेंबरपासून संपुष्टात येणाऱ्या नियमांबद्दल.

क्रेडीट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट

क्रेटीट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी काही रिवॉर्ड पॉइंट मिळतात. नवे वर्ष सुरु होण्यापूर्वी ग्राहकांना हे रिवॉर्ड पॉईंट रिडीम (Redeem) करुन घ्यावे लागणार आहेत. नव्या वर्षात रिवॉर्ड पॉइंटबाबत नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे रिवॉर्ड पॉइंट्सच्या बाबतीत तुम्हाला तत्पूर्वीच निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणजेच ते डिसेंबर महिन्यातच वापरावे लागणार आहेत. (हेही वाचा, Post Office RD: पोस्टात आरडी केल्यास किती मिळतो परतावा? पाच वर्षांसाठी 5000 गुंतवल्यास किती फायदा? घ्या जाणून)

आधार-पॅन लिंक

तुमचा आधार क्रमांक पॅन क्रमांकाशी लिंक नसेल तर तो लवकर करुन घ्या. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2023 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्याची मर्यादा वाढवली आहे. पण, वारंवार मुदतवाढ देऊनही तुम्ही हे काम केले नसेल तर तुम्हाला बँकेशी संबंधीत काम करताना अडचणी येऊ शकतात.

विमा प्रीमियम

तुमचा विमा प्रीमियम नव्या वर्षात काहीसा महाग होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या खिशावरचा भार चांगलाच वाढू शकतो. वाहनांचा वापर आणि देखभाल यावर आधारलेला विमा प्रीमियम नव्या वर्षात वाढविण्याबाबत आणि त्याबाबत नवे बदल IRDAI द्वारेहोण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासंदर्भात आवश्यक ती तरतूद आगोदरच करुन ठेवा. जेणेकरुन जोराचा झटका हळूवार लागेल.

सीएनजी आणि पीएनजीचे दर बदल

नव्या वर्षात सीएनजी आणि पीएनजी दरात बदल होण्याची दाट शक्यता आहे. पेट्रेलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधनाचे दर जारी करतात. विद्यमान वर्षात नोव्हेंबर 2022 च्या पहिल्या दिवशी कोणताही दर बदल करण्यात आला नव्हता. याचा अर्थ नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी हा बदल होणारच नाही असे नाही. त्यामुळे त्याबाबतही आगोदरच नियोजन करा. जेणेकरुन भविष्यातील भुर्दंडाला सामोरे जाण्याची क्षमता वाढेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif