New Parliament Building Ashok Pillar: औरंगाबादचा शिल्पकाराने साकारली संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभाची भव्य प्रतिकृती

नव्या संसदेवरील अशोक स्तंभाची प्रतिकृती औरंगाबाद (Aurangabad) नजिकच्या खुलताबाद (Khultabad) येथील शिल्पकार सुनील देवरे (Sunil Deore) आणि सुशील देवरे (Sushil Deore) यांच्या देवरे अँड असोसिएशनने (Deore and Association) टाटा प्रोजेक्ट लिमिटेडच्या (Tata Project Limited) माध्यमातून साकारली आहे.

अशोक स्तंभाची भव्य प्रतिकृती Photo Credits @blsanthosh

नवीन संसदेच्या इमारतीचे (New Parliament Building) बांधकाम हिवाळी अधिवेशनापर्यंत (Winter Session 2022) पूर्ण होणार असलं तरी दोन दिवसांपूर्वीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी संसदेच्या नवीन इमारतीवर बांधण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केलं आहे. नवीन संसदेच्या छतावर हे अशोक स्तंभ (Ashok Pillar) बांधण्यात आले आहे. हे अशोक स्तंभ कांस्यपासून बनवलेले असून ह्याचे वजन वजन 9 हजार 500 किलो आहे तर  6.5 मीटर एवढी उंची आहे. या भव्य अशोक स्तंभाची प्रतिकृती औरंगाबाद (Aurangabad) नजिकच्या खुलताबाद (Khultabad) येथील शिल्पकार सुनील देवरे (Sunil Deore) आणि सुशील देवरे (Sushil Deore) यांच्या देवरे अँड असोसिएशनने (Deore and Association) टाटा प्रोजेक्ट लिमिटेडच्या (Tata Project Limited) माध्यमातून साकारली आहे. तर धनश्री काळे (Dhanashree Kale) यांनी या स्तंभाचे डिझाइन (Design) केले आहे.

 

टाटा ग्रुपमार्फत अशोक स्तंभ राजमुद्रा शिल्पाचे काम देवरे अँड असोसिएट यांना मिळाले. यासाठी प्रथम मातीची (Clay) व थर्माकोलची (Thermocol) प्रतिकृती तयार करण्यात आली. त्यानंतर 'क्ले मॉडेल' (Clay Model) तयार केले. संसदेच्या पथकाने देवरे यांच्या स्टुडिओत भेट देऊन 'क्ले मॉडेल'ची पाहणी केली आणि त्यामध्ये अपेक्षित बदल सुचवत मॉडेलला मंजुरी दिली. त्यानंतर फायबरचे (Fiber) शिल्प तयार करण्यात आले. त्या फायबरचे शिल्पाचे लहान लहान भाग तयार करून जयपूरच्या (Jaipur) शिल्पित स्टुडिओमध्ये या फायबर शिल्पाचे ब्राँझमधील एकसंघ शिल्प साकारण्यात आले.(हे ही वाचा:-Guru Purnima 2022 निमित्त CM Eknath Shinde, Sanjay Raut ते Rahul Gandhi यांच्याकडून खास ट्वीट करत गुरूंना अभिवादन!)

 

ही भव्य अशोक स्तंभाची प्रतिकृती साकारत सुनील देवरे आणि सुशील देवरे यांनी फक्त एक वास्तू नाही तर इतिहास घडवला आहे. देशातील सर्व स्तरातून सुनिल आणि सुशिलचे मोठे कौतुक होत आहे. देशातील एवढ्या महत्वाच्या वास्तूची प्रकृती साकारण्याची संधी महाराष्ट्राच्या (Maharashtra) पुत्राला मिळाली ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. देशातील नव्या संसदेच्या बांधकामात हातभार लावत या दोन तरुणांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

 

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now