UTS App वरून मुंबई लोकलचं तिकीट देखील केवळ प्रवासाच्या 3 वेळांच्या स्लॉट मध्येच मिळणार

लोकल ट्रेनच्या वेळेचं बंधन कायम रहावं म्हणून युटीएस अ‍ॅपवर देखील सकाळी 7 ते 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत तिकीट विक्री बंद ठेवली जाईल.

Railway Station | Photo Credits: ANI

मुंबई मध्ये सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन (Mumbai Local Train) सुरू झाली आहे. पण कोरोना संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नसल्याने नागरिकांना वेळेचं बंधन घालून मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान प्रवासादरम्यान तिकीटासाठी खिडकीवर गर्दी होऊ नये म्हणून आता युटीएस अ‍ॅप(UTS) वरून तिकीट बुकिंग़ सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रवाशांसाठी नियमांची पायमल्ली होऊ नये. लोकल ट्रेनच्या वेळेचं बंधन कायम रहावं म्हणून युटीएस अ‍ॅपवर देखील सकाळी 7 ते 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत तिकीट विक्री बंद ठेवली जाईल. Mumbai Local प्रवाशांना दिलासा! लॉकडाऊनपूर्वी काढलेल्या पासमध्ये मिळणार मुदतवाढ.

मटाच्या वृत्ता नुसार प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या पासला मुदतवाढ देण्यात आल्याचंदेखील म्हटलं आहे. मात्र ही मुदतवाढ प्रवाशांनी मोबाइलद्वारे पास काढला आहे व ज्यांचा पास मोबाइलमध्ये दिसत नाही, अशा प्रवाशांच्या पासला मुदतवाढ कशी मिळेल यावर लवकरच मार्ग काढला जाणार आहे. यामध्येच सध्या सोशल मीडीयावर व्हॉट्सअॅप द्वारा सोमवार (1 फेब्रुवारी) नंतर रेल्वे पासला मुदतवाढ मिळणार नाही, असे मेसेज व्हायरल झाले होते. मात्र या अफवा असल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. 1 फेब्रुवारी पासून पुढे ही मुदतवाढ दिली जाणार आहे. त्यामुळे विनाकारण तिकीट खिडकी वर गर्दी न करण्याचंदेखील आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई करांना लोकल प्रवासाची मुभा मिळताच पहिल्या दिवशी CSMT स्टेशन मध्ये पहा काय आहे स्थिती (Watch Video).

दरम्यान मुंबई लोकल सुरू होताच नागरिकांची स्टेशन आणि लोकल मध्ये मोठी गर्दी बघायला मिळाली. यावेळेस सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून अनेकजण प्रवास करताना देखील दिसले.

मुंबई लोकल सुरू होताच पहिल्या दिवशी एकूण 7 लाख 19 हजार 847 प्रवाशांची भर पडली. तर लॉकडाउन काळात पास संपलेल्या 22 हजार 756 प्रवाशांना मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आहे.