Mumbai Dangerous Bridge: नव्याने झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळले 15 धोकादायक पूल; जाणून घ्या यादी

अजोय मेहता यांनी दिलेल्या आदेशानुसार जे ऑडिट केले गेले त्यामध्ये पूर्व उपनगरात 7, पश्चिम उपनगरात 19 आणि शहर विभागात 3 धोकादायक पूल आढळले आहेत.

Mumbai CSMT Foot-Over-Bridge Collapse (Photo Credits: PTI)

14 मार्च रोजी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) जवळील ‘हिमालय पूल’ दुर्घटनेमध्ये (Himalaya Bridge Collapse) तब्बल 7 जणांचा जीव गेला होता. झालेल्या चेंगरा चेंगरीमध्ये 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. त्यानंतर मुंबई मधील धोकादायक पुलांचा (Dangerous Bridge) प्रश्न ऐरणीवर आला. या दुर्घटनेनंतर सर्व पुलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 15 पूल नव्याने धोकादायक आढळले आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जे 29 पूल धोकादायक आढळले होते, त्यातील 8 पूल आधीच पाडण्यात आले आहेत. आता पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये उरलेल्या पुलांची डागडुजी होणार आहे.

पावसाळ्यात पुलांची अवस्था अजून खराब होते, ही गोष्ट लक्षात घेऊन हे धोकादायक पूल रहदारीसाठी, वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केले जाणार आहेत. अजोय मेहता यांनी दिलेल्या आदेशानुसार जे ऑडिट केले गेले त्यामध्ये पूर्व उपनगरात 7, पश्चिम उपनगरात 19 आणि शहर विभागात 3 धोकादायक पूल आढळले आहेत.

धोकादायक पुलांची यादी

दरम्यान हिमालय पूल दुर्घटना होण्याआधी पालिकेने केलेल्या 344 पुलंच्या तपासणीमध्ये 14 धोकादायक पूल आढळले होते. या पुलांच्या पुनर्बांधणीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.