Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार कधी? मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मराठा समाजातील मेडिकलच्या मुलांचे आरक्षण रद्द केल्याने आयत्या वेळी प्रवेशाची चांगलीच पंचाईत झाल्याचे हे विद्यार्थी सांगतायत.

Maratha Community Medical Students Protest In Mumbai For Reservation (Photo Credits: File Photo)

Medical Students Protest For Reservation At CSMT: मराठा समाजाच्या (Maratha Caste Reservations)  आरक्षणावरून सुरु असणारे वाद काही केल्या संपताना दिसत नाहीयेत. याच पार्श्वभूमीवर मेडिकल क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी  (Medical Students) आरक्षण नाकारल्याने  मुंबईतील सीएसएमटी (CSMT) स्थानकाबाहेर  विद्यार्थ्यांनी   पुन्हा एकदा आंदोलन पुकारले आहे. तसेच आपल्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना (CM Devendra Fadnavis) आवाहन केले आहे.

मुंबईत विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन याचा निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावर जाण्याचे ठरवले आहे. याबाबत कोर्टाला विचारणा केल्यावर मराठा आरक्षण लागू होण्याआधीच म्हणजे 13 नोव्हेंबर ला मेडिकलचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले होते, त्यामुळे आरक्षण लागू केलेले नाही असे उत्तर दिले जातेय.या गोंधळामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांनी या विषयात जातीने लक्ष घालायला हवे अशी मागणी केली .

नेमका गोंधळ काय घडला ?

30 नोव्हेंबर 2018 पासून महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र नागपूर (Nagpur) खंडपीठाच्या निर्णयाप्रमाणे मेडिकलच्या अभ्यासक्रमातील कोणत्याही विद्यार्थ्याला या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असे, सांगितले गेले. Maharashtra PG Medical Admission 2019 प्रवेशप्रक्रियेत यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही- हायकोर्ट

पदव्युत्तर  अभ्यासक्रमात प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना एसी/बीसी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले होते यातून अर्ज केलेल्या काही मुलांचे प्रवेश निश्चित होऊन त्यांचे काम देखील सुरु झाले होते, मात्र अचानक हे पोर्टल अनुपलब्ध करून यामार्गे झालेले प्रवेश रद्द करण्यात आले . याशिवाय मराठा समाजातील मुलांना सामान्य म्हणजे ईडब्लूएस मार्गानी अर्ज करण्याचा मार्ग बंद झाला होता त्यामुळे आयत्या वेळी प्रवेशाची चांगलीच पंचाईत झाल्याचे हे विद्यार्थी सांगतायत.

काय आहे विद्यार्थ्यांची मागणी?

मुख्यमंत्र्यांना एसी/बीसी (AC/BC Act 2018, Section 17) कायदा 2018 च्या कलम 17 नुसार याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे त्यामुळे याचा योग्य तो वापर करून आमच्या समस्या सोडवाव्यात जेणेकरून कोर्टाच्या वाऱ्यांमध्ये आमचा वेळ न जाता अभ्यासावर लक्ष देता येईल असे सांगितले आहे.

या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काही मुख्य जिल्ह्यांमधील तरुणांना मराठा  क्रांती मोर्चा संघटनेतर्फे बोलवण्यात आले आहे, मात्र यावेळेस आम्हाला योग्य न्याय न मिळाल्यास शांत बसणार नसल्याची धमकी संघटनेतर्फे देण्यात येत आहे.